ताज्या बातम्यासामाजिक

मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर एक एकेरी विशेष गाडी चालवणार व्हाया पुणे, सांगली

मुंबई (बारामती झटका)

मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कोल्हापूर विशेष शुल्कावर एक एकेरी विशेष गाडी चालवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कोल्हापूर व्हाया पुणे, सांगली

अतिजलद एकेरी विशेष गाडी क्रमांक 01099 दि. २०.०२.२०२४ (मंगळवार) रोजी सकाळी ००.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि त्याच दिवशी ११.३० वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे पोहोचेल.

थांबे : दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, हातकणंगले आणि कोल्हापूर.

संरचना – १७ आईसीएफ डब्बे – एक वातानुकूलित द्वितीय, चार वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ४ जनरल सेकंड क्लास.

आरक्षण – 01099 एकमार्गी विशेष ट्रेनसाठी विशेष शुल्कावर बुकिंग दि. १६.०२.२०२४ रोजी सर्व पीआरएस स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.

प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button