मगराचे निमगाव येथील प्रगतशील बागायतदार यांची तुर्की चार फुटी बाजरी कणसाच्या शेती फार्मला सदिच्छा भेट..
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस येथील राजाराम मगर पाटील शेती फार्ममध्ये तुर्की जातीचे बाजरीच्या बियाणाचा प्लॉट तयार करण्यात आलेला आहे. सदरच्या तुर्की जातीच्या बियाचे कणीस चार फूट लांब आहे. माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच राजाराम मगर पाटील शेती फार्ममध्ये उत्पादित केलेले असल्याने बारामती झटका यूट्यूब चॅनलवर सदरच्या बाजरी वाणाविषयीची संपूर्ण माहिती प्रगतशील बागायतदार व उद्योजक लक्ष्मणराव मगर पाटील यांनी सांगितलेली होती. सोशल मीडियावर सदरची बातमी व्हायरल झाल्यानंतर निमगाव मगराचे येथील प्राध्यापक तानाजीराव मगर, अर्जुन मगर, नामदेव (अण्णा) मगर, आगतराव दिगंबर मगर, विलास (बापू) मगर, अशा बागायतदारांनी सदिच्छा भेट दिली. यावेळेस राजाराम मगर पाटील शेती फार्मचे प्रगतशील बागायतदार बाळासाहेब मगर पाटील उपस्थित होते.
राजाराम मगर पाटील शेती फार्ममध्ये अनेक पिकांचे व फळबागांचे उत्पादन घेतले जाते. मगर पाटील परिवारामधील बाळासाहेब, लक्ष्मणराव व अरुणराव या त्रिमूर्तींनी शेतीबरोबर उद्योग व्यवसायामध्ये प्रगती केलेली आहे. उद्योग व्यवसायानिमित्त बाहेरच्या देशात गेल्यानंतर उद्योजक लक्ष्मणराव मगर पाटील यांनी तुर्की जातीचे बाजरी बियाणे आणलेले आहे. आपल्या शेतामध्ये सदरच्या बियाणाचा प्लॉट तयार केलेला आहे. सध्या शेतामध्ये बाजरीचे पीक डौलाने डुलत आहे. कणसाची लांबी चार फूट आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यात नाविन्यपूर्ण बाजरीच्या बियाणाची उत्पत्ती केलेली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सदरच्या बियाणाचा उपयोग व्हावा आणि उत्पादनामध्ये वाढ व्हावी, असा उदात्त हेतू मगर पाटील परिवार यांनी ठेवलेला आहे. एकरामध्ये पन्नास क्विंटलच्या आसपास बाजरीचे उत्पादन निघत आहे.
सदरचा प्लॉट सोशल मीडियावर बारामती झटका यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर अनेक शेतकरी यांनी आपल्या शेतामध्ये तुर्की जातीच्या बियाणाचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. अनेक प्रगतशील बागायतदार शेतकरी सदरच्या प्लॉटला भेटी देत आहेत. निमगाव मगराचे शेतीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असणाऱ्या गावातील प्रगतशील बागायतदार यांनी भेट देऊन सदरच्या प्लॉटची पाहणी केलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng