महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना आयोजित अकलूज फेस्टिवल 2024 ला आजपासून सुरुवात
बुधवार २५ डिसेंबर ते मंगळवार दि. ३१ डिसेंबर अकलूज फेस्टिवलचे आयोजन
अकलूज (बारामती झटका)
अकलूजचे ग्रामदैवत आई अकलाई देवी यांच्या आशीर्वादाने व महाराष्ट्र जनसेवा संघटनेचे सर्वेसर्वा स्वर्गीय लोकनेते प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रेरणेने, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने अकलूज फेस्टिवल २०२४ चे आयोजन बुधवार दि. २५ डिसेंबर २०२४ ते मंगळवार दि. ३१ डिसेंबर २०२४ या दरम्यान धवल श्रीराम मंदिर, धनश्री नगर, इंदापूर रोड, अकलूज, ता. माळशिरस येथे करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना आयोजित नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा. २०२४ या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री. डॉ. एम. के. इनामदार यांच्या शुभहस्ते शुभहस्ते बुधवार दि. २५/१२/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दयानंद गोरे साहेब मुख्याधिकारी अकलूज, श्रीमती डॉ. शिंदे मॅडम अध्यक्ष, वैद्यकिय अधिकारी माळशिरस तालुका, डॉ. संजय सिद अध्यक्ष, IMA अकलूज आदी मान्यवरांसह निमा व इंडियन मेडिकल असोसिएशन अकलूजचे सर्व डॉक्टर सदस्य उपस्थित राहणार आहेत. तसेच याच दिवशी सायंकाळी ६ ते १० या वेळेत शाहिरी लोकधारा सादर करते शाहीर राजेंद्र कांबळे आणि संच यांचा कार्यक्रम होणार आहे. दि. २६/१२/२०२४ रोजी महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम, दि. २७/१२/२०२४ रोजी चांडाळ चौकडीच्या करामती, दि. २८/१२/२०२४ रोजी झी मराठी भिशी कार्यक्रम, दि.२९/१२/२०२४ रोजी महिलांसाठी पैठणी व विविध मनोरंजन कार्यक्रम, दि. ३०/१२/२०२४ रोजी महाराष्ट्राची लोककला लावण्याचा अविष्कार, दि. ३१/१२/२०२४ रोजी प्रसिद्ध सिने कलाकार सह ऑर्केस्ट्रा जल्लोष व न्यू इयर सेलिब्रेशन, आंतरराष्ट्रीय दर्जाची आतिषबाजी होणार आहे. सदरचे सर्व कार्यक्रम सायंकाळी ६ ते १० या वेळेत होणार आहेत.
तसेच यामध्ये फन फेअर, विविध प्रकारचे ब्रेक डान्स, सलोबो, नावडी, टोरा टोरा, टॉवर रेंजर, मौत का कुवा, ड्रॅगनट्रेन, मिकी माऊस, जम्पिंग वॉटर बोट, पाळणे, फॅशनेबल कपडे, गृहपयोगी वस्तू तसेच खवय्यांसाठी असंख्य प्रकारचे खाद्य स्टॉल, नृत्य व महिलांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम असणार आहेत.
या बहारदार आणि मनोरंजनपर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.