ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजनेचा तालुक्यातील गावोगावी लाभ देणार – बाळासाहेब सरगर

माळशिरस (बारामती झटका)

हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश सरकारने ‘लाडली बहना’ या नावाने केलेली योजना महाराष्ट्रामध्ये ‘लाडकी बहीण’ या नावाने घोषित केले असून तिची अंमलबजावणी एक जुलैपासून चालू झाली आहे. या योजनेमध्ये महिलांना महिन्याला 1500 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठीची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत करण्यात आली आहे. या योजनेत पूर्णपणे फॉर्म भरलेल्या लाभार्थींना एक ऑगस्टपासून त्यांच्या बँकेच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे
१. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि. ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
२. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.
३. सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.
५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.
६. रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणाऱ

योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल. असा महत्वपूर्ण निर्णय घेताना योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले.
अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा, लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्याचा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयांचा शासन निर्णय तातडीने जाहीर करण्यात आला आहे. या योजनेमध्ये अनेक जाचक अटी असल्याची ओरड सामान्य माणसांमधून येत होती. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने डोमासाईल उत्पन्नाचा दाखला ऐवजी रेशन कार्ड असे अनेक बदल केल्याने सर्वसामान्यांना या योजनेचा सहज फायदा घेता येईल. अशी सुटसुटीत कागदपत्र दिल्याने या योजनेचा अनेकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाळासाहेब सरगर जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा यांनी केले.

ही योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी माळशिरस तालुक्यातील पंचवीस हजार लाभार्थ्यापर्यंत पोचण्याचा भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुक्यांचा मनोदय असून त्या दृष्टीने तयारी सुद्धा केली आहे. प्रत्येक गावात जाऊन अभियान घेतलं जाणार आहे. त्यासाठी तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासमवेत बैठका घेऊन माळशिरस तालुक्यातील प्रत्येक कुटुंबात या योजनेचा फायदा होईल, अशा प्रकारचे नियोजन केलं आहे. यापूर्वी महाराष्ट्र सरकारने अनेक योजना राबवल्या परंतु, त्यांची अंमलबजावणी व जाहिरात करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी कमी पडल्याने या वेळेला त्यांनी सोशल मीडिया व वृत्तपत्रे मिळण्याचे माध्यमातून ज्यादा प्रमाणात जाहिरात करण्याचे ठरले आहे.

2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे मतदान वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या शेतकऱ्यांसह अनेक योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टी पुढचे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये करेल, असा विश्वास बाळासाहेब सरगर यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला सोलापूर जिल्हा सहप्रभारी के. के. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे, प्रदेश किसान सचिव सोपान नारनवर, सरचिटणीस संजय देशमुख, युवा मोर्चा चिटणीस आकाश सावंत, युवा मोर्चा उपाध्यक्ष दादासाहेब खरात, युवा मोर्चा उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, शहर उपाध्यक्ष राजेंद्र वळकुंदे, मिनीनाथ मगर आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort