माळशिरस पंचायत समितीच्या पारदर्शक व लोकाभिमुख कार्यकालावर सर्वसामान्य जनता व लाभार्थी समाधानी…
प्रभारी गटविकास अधिकारी मा. मनोज राऊत यांनी कामकाजात अधिकारी व जनता यांचा समन्वय ठेवला…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. विनायक गुळवे सेवानिवृत्त झाल्यानंतर करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. मनोज बापूराव राऊत यांच्याकडे माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पदाचा प्रभारी पदभार जिल्हा परिषदेकडून सुपूर्त करण्यात आलेला आहे. माळशिरस पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी मा. मनोज राऊत यांनी पदभार स्वीकारून प्रत्यक्ष कामकाजास दि. 03/06/2024 रोजी सुरुवात करून माळशिरस पंचायत समितीचा पारदर्शक व लोकाभिमुख कार्यकालावर सर्वसामान्य जनता व लाभार्थी समाधानी आहेत. प्रभारी गटविकास अधिकारी मा. मनोज राऊत यांनी पंचायत समितीच्या कामकाजात अधिकारी व जनता यांचा समन्वय ठेवलेला आहे.
करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. मनोज बापूराव राऊत यांचे मूळ गाव करमाळा तालुक्यातील घोटी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून 2014 साली त्यांची चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरुवातीस नेमणूक झाली. त्यानंतर त्यांनी बुलढाणा, लातूर जिल्ह्यात काम केलेले आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी पदावर कार्यरत आहेत. प्रशासनावर वचक व कार्याची पद्धत, जनता व अधिकारी यांच्यात समन्वय असणारे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मा. मनोज बापूराव राऊत यांच्याकडे माळशिरस पंचायत समितीचा प्रभारी पदभार देण्यात आलेला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मनीषा आव्हाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्याने श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांबरोबर तालुक्यामध्ये येणाऱ्या सर्व पालख्यांचे योग्य नियोजन व व्यवस्था करून सुख सुविधा उपलब्ध करून वारकरी व भाविक भक्तांचे आशीर्वाद मिळविलेले आहेत. केलेल्या कार्यकर्तृत्वाची व सर्वसामान्य जनतेला योजनेची माहिती हवी यासाठी प्रेस नोट देऊन जनहितार्थ काम करीत असतात. जेणेकरून सर्वसामान्य लोकांना योजनेची माहिती व्हावी असाही चांगला उद्देश त्यांनी ठेवलेला आहे.

माळशिरस व करमाळा दोन्ही पंचायत समितीचा पदभार अतिशय उत्कृष्टपणे सांभाळलेला आहे. पंचायत समितीमध्ये आलेल्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिलेला असल्याने तालुक्यामध्ये प्रभारी गटविकास अधिकारी यांच्या कामकाजामुळे माळशिरस तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.