महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे संजयमामा शिंदे यांच्या हस्ते तर, रणजीत भैय्या शिंदे यांचे उपस्थितीत उद्घाटन संपन्न.

कुस्ती स्पर्धेत ३०० मल्लांनी घेतला सहभाग
टेंभुर्णी (बारामती झटका)
सोलापूर शहर कुस्तीगीर संघ व सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार संजयमामा शिंदे व जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. दि. १७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता टेंभुर्णी ता. माढा, येथे महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ टेंभुर्णी येथील कुर्डूवाडी रोडवर ब्रिजच्या नजीक करण्यात आला. प्रारंभी संजयमामा शिंदे यांच्या हस्ते गादी व माती आखाड्याचे पूजन करण्यात आले. दि. १७ व १८ रोजी निवड चाचणी होणार आहे.


यावेळी महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन तुकाराम उर्फ बंडूनाना ढवळे, जिल्हा परिषद माजी सभापती शिवाजीराव कांबळे, सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान अस्लम काझी, पैलवान नागनाथ खटके पाटील, कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ महाडिक, वस्ताद आण्णासाहेब ढाणे, विठ्ठल ढवळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागेश खटके, शिवविचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय खटके पाटील, धनंजय मोरे, दादा कोल्हे, योगेश बोंबाळे, उमेश इंगळे, सुधीर मिस्किन, भाऊसाहेब काळे, नितीन खटके, गोरख खटके, सचिन पवार, माऊली महाडिक, आण्णासाहेब पराडे, गौतम माने आदी उपस्थित होते
या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध गटातील सुमारे ३०० पैलवानांनी सहभाग नोंदवला. एकुण दहा गटातून ६० पैलवानांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड होणार आहे. सोलापूर शहर व सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघाची एकत्र निवड चाचणी होणार आहे. सोलापूर जिल्हा अ, सोलापूर जिल्हा ब, सोलापूर शहर असे तीन संघ निवडले जाणार आहेत.


दहा वजन गटात ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ७९ किलो, ८६ किलो, ९२ किलो, ९७ किलो, ८६ + ते १२५ किलो (महाराष्ट्र केसरी) या गटातून होत असलेल्या महाराष्ट्र केसरी वरिष्ठ अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी पाठविले जाणार आहेत.
सुत्रसंचलन धनाजी मदने यांनी केले. पंच म्हणून दत्तात्रय माने, रोहिदास आमले, नितीश काबली, अंकुश आरकिले, सागर मारकड, निलेश मारणे, श्रावण चोरमले, चंद्रकांत मोहोळ, गणेश जाधव, हनिफ पटेल यांनी काम पाहिले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.