क्रीडाताज्या बातम्या

महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील व उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर यांच्यात लढत होणार…

श्रीनाथ बोधोबा यात्रा कमिटी लोणंद येथे सालाबादप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्रातील नामांकित पैलवानांच्या निकाली कस्त्यांचे जंगी मैदान संपन्न होणार – माजी सरपंच हनुमंत (अण्णा) रुपनवर.

लोणंद (बारामती झटका)

श्रीनाथ बोधोबा यात्रा कमिटी, लोणंद ता. माळशिरस, येथे सालाबादप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्रातील नामांकित पैलवानांच्या निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान रविवार दि. 01/09/2024 रोजी दुपारी 02 वाजता लोणंद (बोधोबा) येथे लोणंद गावचे माजी सरपंच श्री‌. हनुमंत (अण्णा) रुपनवर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.

सदरच्या कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील आर्मी पुणे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर कोल्हापूर यांच्यात 2 लाख 50 हजार रुपये इनामावर लढत होणार आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे पैलवान वैभव माने कण्हेर व शिवराम दादा तालीम पुणे पैलवान सुबोध पाटील यांच्यात 1 लाख 50 हजार इनामावर लढत होणार आहे.

पैलवान जमीर मुलाणी विरुद्ध पैलवान श्रीमंत भोसले, पैलवान शुभम माने विरुद्ध पैलवान पांडुरंग शिंदे, पैलवान नितीन निलेश खताळ विरुद्ध पैलवान गौरव चौगुले, पैलवान रणजीत पवार विरुद्ध पैलवान शंकर कुंभार, पैलवान उमर नदाफ विरुद्ध पैलवान प्रसाद लवटे, पैलवान रोहित चव्हाण विरुद्ध धीरज कचरे, पैलवान गोरख रुपनवर विरुद्ध पैलवान सुरेश वाघमोडे यांच्यात लढती होणार आहेत.

तसेच पैलवान बबलू चव्हाण, पैलवान शुभम खुडे, पैलवान प्रज्योत निटवे, पैलवान आदित्य गोडवे, पैलवान माऊली मोहिते, पैलवान आरेश रुपनवर, पैलवान आर्यन रुपनवर, पैलवान शंभू इंगळे, पैलवान समाधान मोहिते यांच्या जोड पाहून कुस्ती लावली जाईल. सदरच्या मैदानामध्ये प्रेक्षणीय कुस्त्यांमध्ये पैलवान धुळदेव पांढरे नातेपुते विरुद्ध पैलवान रणजीत राजमाने सातारा, पैलवान रोहित निटवे नातेपुते विरुद्ध पैलवान सुरज राऊत कोल्हापूर, पैलवान अतिश मोटे नातेपुते विरुद्ध पैलवान बाळू घोडके कोल्हापूर, पैलवान संकेत वाघमोडे नातेपुते विरुद्ध पैलवान रणजीत झंजे सदाशिवनगर, पैलवान हर्षद मोटे नातेपुते विरुद्ध पैलवान सुजित मदने विडणी, पैलवान संग्राम शेंडगे नातेपुते विरुद्ध पैलवान विशाल सुळ सातारा, तर उद्घाटनाची कुस्ती पैलवान निरंजन गावडे नातेपुते विरुद्ध पैलवान संग्राम मोटे फोंडशिरस यांच्यात होणार आहे.

सदरच्या कुस्तीचे निवेदक कुस्ती भूषण पुरस्कार श्री. हनुमंत शेंडगे व श्री. सोमनाथ दडस माळशिरस हे करणार आहेत. तरी कुस्ती शौकीन, ग्रामस्थ व बोधोबा भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. हनुमंत (अण्णा) रुपनवर माजी सरपंच व श्रीनाथ बोधोबा यात्रा कमिटी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
marsbahis hacklink market casibom