महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यात विकासकामांना गती…

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी रस्त्यांच्या विकासकामांना 19 कोटी बजेटमध्ये मंजूर केले….
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यात विकासकामांना गती मिळाली असून भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी कायमच माळशिरस तालुक्याच्या विकासकामांना गती दिली आहे. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बजेटमधून माळशिरस तालुक्याच्या रस्त्यांच्या विकासकामांना 19 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केलेला आहे.

त्यामध्ये नीटवेवाडी, डोंगरवाडी, भांब, इस्लामपूर, गोरडवाडी, तरंगफळ रस्ता चार कोटी, प्र.जि.मा. 117 ते तरंगफळ, झंजेवाडी, खुडूस, विझोरी, चौंडेश्वरवाडी, अकलूज, सवतगव्हाण, तांबवे ते गणेशगाव ते रा.मा. 145 तालुका मिळणारा रस्ता चार कोटी रुपये, कुरोली, कुरबावी, ते पिरळे, फोंडशिरस, तिरवंडी, चाकोरे, अकलूज रस्ता तीन कोटी रुपये, कुरवली, कुरबावी, पिरळे, फोंडशिरस, कदमवाडी, तिरवंडी, चाकोरे ते अकलूज रस्ता चार कोटी रुपये, वेळापूर, तांदुळवाडी ते महिम रस्ता चार कोटी रुपये असा निधी बजेट मधून मंजूर केलेला आहे.
माळशिरस तालुक्यातील अनेक दिवसांच्या प्रलंबित रस्त्यांना निधी मंजूर केलेला असल्याने माळशिरस तालुक्यात लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या दमदार कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.