महाराष्ट्र राज्यात देवाभाऊ, सोलापूर जिल्ह्यात जयाभाऊ, माळशिरस तालुक्यात रामभाऊ आता कसं, भाऊ म्हणतील तसं…
सोलापूर व सातारा जिल्ह्यातील राजकीय घराण्यातील सिंह, वाघ, घोडे, उंट, लांडगे यांचे रिंगमास्टर कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह, एकच दादा, रणजीत दादा
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शपथ घेऊन महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ स्थापन झालेले होते. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन खातेवाटप झालेले होते. मात्र, जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांच्या नियुक्ती राहिलेल्या होत्या. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी सातारा जिल्ह्याचा मानबिंदू, दुष्काळी जनतेचा आधारवड महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. श्री. जयकुमार उर्फ जयाभाऊ गोरे यांनाच पालकमंत्री केलेले आहे. राज्यात देवेंद्रजी फडणवीस उर्फ देवा भाऊ, सोलापूर जिल्ह्यात जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ, तर माळशिरस तालुक्यात भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते उर्फ रामभाऊ त्यामुळे राज्यात, जिल्ह्यात व तालुक्यात आता कसं भाऊ म्हणतील तसं… अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. सातारा व सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घराण्यातील सिंह, वाघ, घोडे, उंट, लांडगे यांचे माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर रिंग मास्टर असणार आहेत. सोलापूर व सातारा जिल्ह्यात एकच दादा, रणजीत दादा अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे.
माढा व सोलापूर लोकसभा मतदार संघात पुन्हा भाजपचे कमळ फुलवण्याकरता दुष्काळी जनतेचा आधारवड ना. जयाभाऊ गोरे यांना संधी द्यावी, अशी सोलापूरच्या जनतेतून मागणी होत आहे. अशी बातमी बारामती झटका वेब पोर्टल वर मंत्री होण्याअगोदर संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी प्रसारित केलेली होती ती, तंतोतंत खरी ठरली…
माढा लोकसभा व सोलापूर लोकसभा मतदार संघात भाजपचे दोन्ही उमेदवार पराभूत झालेले आहेत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्याचे राजकारणात वेगळ्या पद्धतीने प्रत्येक निवडणुकीत वेगळी समीकरणे घडत गेली. त्यामुळे माढा व सोलापूर लोकसभेची जागा पुन्हा भाजपच्या ताब्यात येण्याकरता खऱ्या अर्थाने आमदार जयाभाऊ गोरे यांच्यासारख्या तरुण व उमद्या कार्यकर्त्यांची गरज आहे. महाराष्ट्राच्या विधानभवनात चौथ्यांदा प्रवेश करीत असलेले आमदार जयाभाऊ गोरे यांनी सत्ता असो अथवा नसो, माण-खटाव मतदार संघासाठी कायम कडवी झुंज दिलेली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात खऱ्या अर्थाने आमदार जयाभाऊ गोरे यांना पालकमंत्री केल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल व राजकारणातील चाणक्य यांचे करेक्ट कार्यक्रम होईल, यासाठी महायुतीतील घटकपक्ष व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी सोलापूरच्या जनतेची मागणी लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व आमदार जयाभाऊ गोरे यांच्याकडे द्यावे, अशी सर्वसामान्य व तळागाळातील लोकांमध्ये भावना निर्माण झालेली होती. जनतेच्या भावनेचा विचार करून देवाभाऊ यांनी सोलापूर जिल्ह्याच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे. सातारा जिल्ह्यातील हुकूमशाही व सोलापूर जिल्ह्यातील विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्याकरता राजकीय घराण्यातील सिंह, वाघ, घोडे, उंट, लांडगे यांचे रिंगमास्टर कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या हातात हंटर असल्याने एकच दादा, रणजीत दादा अशी राजकीय परिस्थिती भविष्यात निर्माण होणार आहे. त्यामुळे गद्दारांचा करेक्ट कार्यक्रम पाहण्याकरता सोलापूर जनतेला ओढ लागलेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.