महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर …

मुंबई (बारामती झटका)
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या निवडणुकांची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्यासाठी आता निवडणूक जाहीर होत आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 23 तारखेला मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक :
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2024 (मंगळवार)
- अर्ज पडताळणीची तारीख – 30 ऑक्टोबर 2024 (बुधवार)
- अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2024 (सोमवार)
- मतदानाचा दिवस – 20 नोव्हेंबर 2024
- मतमोजणीची तारीख – 23 नोव्हेंबर 2024
महाराष्ट्रातल्या एकूण मतदारांच्या आकडेवारीचा विचार केला तर महाराष्ट्रात 9.63 कोटी मतदार आहेत, त्यापैकी 4.97 कोटी पुरुष मतदार आहेत. तर 4.66 कोटी महिला मतदार आहेत.
महाराष्ट्रात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्र आहेत. यात शहरांमध्ये 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 मतदान केंद्र आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.