महाराष्ट्र विकास युवा सेना जिल्हा संघटकपदी साईराज अडगळे यांची नियुक्ती

अकलूज (बारामती झटका)
अकलूज (ता. माळशिरस) शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या. यावेळी युवा सेना सोलापूर जिल्हा संघटक, साईराज अडगळे, माळशिरस तालुका युवा सेना अध्यक्ष आदित्य काकडे, युवा सेना अकलूज शहर उपाध्यक्ष अजित माने, युवा सेना अकलूज शहर सचिव सचिन सांळुखे, युवा सेना अकलूज शहर सरचिटणीस अविनाश लोखंडे, युवा सेना अकलूज शहर संघटक चेतन साठे आदींची निवड करण्यात आली.
यावेळी पक्षप्रमुख किरण साठे यांच्या हस्ते सर्वांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी राज्य समन्वयक अजितदादा साठे, जनकल्याण मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थचे अध्यक्ष संतोष खंडागळे, म. वि. से. मारकरवाडी शाखा सचिव दत्तात्रय मारकड, बापूसाहेब वाघमारे, गिरीराज अडगळे, सुमित लोखंडे, कुणाल कांबळे, केतन भोसले, जयवर्धन मोरे, पत्रकार सचिन रणदिवे, रुक्मिणीताई रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.