आरोग्यताज्या बातम्याराजकारणसामाजिक

राज्य शासनाकडून ‘निर्मल वारी’ द्वारे स्वच्छतेचा नवा ‘बेंचमार्क’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर (बारामती झटका)

वारकऱ्यांची अखंड श्रद्धा आणि सेवाभाव यांचं प्रतीक असलेल्या आषाढी वारीत यंदा ‘स्वच्छते’चा नवा अध्याय लिहिला गेला. राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘निर्मल दिंडी’ उपक्रमाचा समारोप आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर येथे झाला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “आपले संत निसर्गप्रेम व स्वच्छतेचा संदेश देत आले आहेत. नद्यांवर प्रेम करण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. ‘निर्मल वारी’ उपक्रमातून आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या या शिकवणीला कृतीत आणत आहोत.”

वारीमध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. पूर्वी स्वच्छतेची सुविधा अपुरी असल्याने वारीनंतर कचऱ्याचे मोठे प्रश्न निर्माण होत असत. २०१८ साली ही समस्या लक्षात घेऊन ‘निर्मल वारी’ उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.

या उपक्रमाअंतर्गत राज्य शासनाने पालखी मुक्काम ठिकाणी शौचालयांची भव्य प्रमाणात उभारणी केली. त्यामुळे यंदाची वारी अधिक स्वच्छ आणि सुव्यवस्थित झाली आहे. विशेष म्हणजे यामुळे महिला वारकऱ्यांची संख्याही लक्षणीय वाढल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनात वारीने एक नवीन उंची गाठली. सोलापूर जिल्हा प्रशासन “‘निर्मल वारी” उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्रामविकास, आरोग्य विभाग आणि संबंधित सर्व यंत्रणांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”

तसेच, वैद्यकीय सहायता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचे आणि राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या महिला सेवेच्या उपक्रमाचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, जयकुमार रावल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार विजय देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, माजी आमदार राम सातपुते, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom