महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या सिंहाने दिल्लीच्या संसदेत फोडली डरकाळी; नुसते नावात नाही तर कामातही “सिंह”
मराठा आणि धनगर समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी भविष्यात किडण्या विकाव्या लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली
दिल्ली (बारामती झटका)
देशाच्या संसदेमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. संसदीय सदस्य अनेक प्रश्न सभागृहांमध्ये उपस्थित करीत असतात. सध्या महाराष्ट्रात मराठा समाज व धनगर समाज बांधवांचा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत आहे. याच धर्तीवर माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्लीच्या संसदेमध्ये मराठा व धनगर समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी भविष्यात किडण्या विकाव्या लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगत सभागृहाचे लक्ष वेधून धनगर व मराठा समाज बांधवांच्या व्यथा व आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा “सिंह” दिल्लीच्या हिमालयात गरजला.
नावात नुसते “सिंह” शब्द नाही तर सिंहासारखी डरकाळी संसदेत फोडलेली असल्याने महाराष्ट्रातील तमाम मराठा व धनगर समाज बांधवांमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नावर समाधानी व आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
माढा लोकसभेचे कार्यतत्पर खासदार यांनी संसदेमध्ये महाराष्ट्रात मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मराठा मुलांच्या शिक्षणासाठी पालकांना किडन्या विकण्याची वेळ आली आहे, तेव्हा या दोन्ही समाजाच्या आरक्षणाच्या विषयासाठी संयुक्त समिती गठण करून दोन्ही समाजाला न्याय देण्यात यावा, अशी आग्रही मागणी यांनी संसदेत केली. सभापती यांच्यासमोर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मातृभाषेत मराठीतून निवेदन करण्याचा आग्रह केला व सभापतींनी त्यांना आनंदाने समंती दिली.
सभागृहात बोलताना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या ३३ टक्के आहे. या समाजाने देशाला ज्या ज्या वेळी गरज पडेल त्या त्या वेळी आपल्या छातीचा कोट करून लढा दिला आहे. देव, उपदेश व धर्म वाचवण्यासाठी हा समाज नेहमीच पुढे राहिला आहे. या समाजाला २५ वर्षांपूर्वी कुटुंबाला असणारी २५ एकर जमीन दोन अडीच एकरावर आली आहे. त्यामुळे या समाजाला अतिशय आर्थिक आणीबाणीतून जावे लागत आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सुध्दा यांच्याकडे पैसे नाहीत. त्यासाठी किडन्या विकाव्या लागतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये सर्वात जास्त मराठा शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत. गरिबीमुळे अतिशय दीनदुबळ्या अवस्थेत हा समाज महाराष्ट्रात जगत आहे. त्यामुळे या समाजाला महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण देण्याकरिता मी आपल्याद्वारे केंद्रीय मंत्री महोदयांना निवेदन करतो.
महाराष्ट्रात धनगड कोणीच नाही…
महाराष्ट्रात धनगर समाजाचीही हीच अवस्था आहे. महाराष्ट्राबाहेर या समाजाला एस टी आरक्षण आहे. महाराष्ट्रात मात्र धनगर व धनगड असा विपर्यास केला जात आहे. वास्तविक महाराष्ट्रात धनगड कोणीही नाही, तसे ऑफिडेव्हीट देऊन महाराष्ट्र शासनाने यामध्ये स्पष्टता आणली आहे. धनगर व धनगड या शब्दातील गफलतीमुळे राज्यातील धनगर समाज आरक्षणापासून वंचीत आहे. त्यामुळे या दोन्ही समाजासाठी संयुक्त समिती गठण करून व बैठक घेऊन या दोन्ही समाजाला न्याय मिळावा. अशी चक्क मराठीतून मागणी केली आहे.
आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी हे दोन्ही समाज गेली वर्षानुवर्षे झगडत असताना खा. निंबाळकर यांनी हा मुद्दा संसदेत लावून धरल्याने मराठा व धनगर दोन्ही समाजातून कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे अभिनंदन केले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Great mix of humor and insight! For additional info, click here: READ MORE. Any thoughts?