महर्षि संकुलात “जंगल संवर्धनाचा नवा अध्याय”
७५ हजार सिडबाॕल आणि वृक्षलागवडीतुन जगाला मौलीक संदेश…
अकलूज (बारामती झटका)
दिवसेंदिवस वाढत जाणारी तापमान वाढ रोखावी. पाणी पातळी वाढुन वातावरणात प्राणवायुचा घसरलेला स्तर वाढावा, या सामाजिक जाणीवेतून शंकरनगर येथील “महर्षि संकुलात” एक शिक्षक एक झाड मोहिमे बरोबरच “७५ हजार सिडबाॕल” तयार करुन पर्यावरण वाढीसाठी जगाला एक नवा आदर्श घालुन दिला.
शिक्षण प्रसारक मंडळ अकलुजचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील व संचालीका स्वरुपाराणी मोहिते पाटील यांचे मार्गदर्शन आणि महर्षि प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या संकल्पनेतुन पर्यावरण वाढीसाठी महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, महर्षि प्रशाला प्राथमिक विभाग व लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यांनी संयुक्तपणे “महर्षि संकुल” येथे पर्यावरण वाढीसाठी नवा अध्याय सुरु झाला.
पर्यावरणाचा ऱ्हास होवुन सकल सृष्टीसाठी धोक्याची घंटा असलेले वाढते तापमान, खालावलेली पाणी पातळी, प्राणवायुची घसरलेली पातळी यावर रामबाण ऊपाय म्हणजे वृक्षारोपण. मोठ्या प्रमाणात झालेल्या जंगलतोडीचे दुष्परिणाम रोखण्यासाठी नव्याने वृक्षलागवड आणि संगोपन ही काळाची गरज आहे. त्यासाठी महर्षि संकुलात सुरु केलेला अभिनव उपक्रम जगासाठी आणि पर्यावरण वाढीसाठी दिशादर्शक ठरणारा आहे.
कै. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांची ९९ वी जयंती आणि जयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत मोहोत्सवी वाटचालीनिमित्त तीन ही प्रशालांनी जागतिक पातळीवर नोंद व्हावी, असा उपक्रम राबविला.
यामध्ये मागील दोन महिन्यांपासुन प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तब्बल ७५ हजार सिडबाॕल बनविले. त्याप्रमाणे एक शिक्षक एक झाड उपक्रम राबवित ७५ महर्षि संकुल परीसरात नव्याने आणखी ७५ वृक्ष लागवड केली. एवढ्यावरच न थांबता प्रत्येक शिक्षकावर त्या-त्या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी देत पर्यावरण वाढीसाठी दमदार पाऊल टाकले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहकार महर्षि कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी वृक्षतोडीचे दुष्परिणाम सांगुन जंगल संवर्धन करण्याची गरज असल्याचे सांगितले. ७५ हजार सिडबाॕल म्हणजे नवा विक्रम आहे. हा विक्रम जगाला नक्कीच दिशादर्शक ठरेल. तसेच वृक्षारोपण करताना विदेशी अथवा शोभेची झाडे लावण्यापेक्षा देशी वृक्षांची लागवड करण्याचे आवाहन केले.
सदर प्रसंगी प्रशाला समिती सभापती अॕड. नितिन खराडे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर, वनपाल धर्मेंद्र सावंत, संजय लडकत, वनरक्षक कल्पना पांढरे, विजय काळे, नारायण बनकर, कृषि मंडलाधिकारी सतिश कचरे, शिरीष मुळे, मुख्याध्यापक संजय गळीतकर, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी पारसे, कन्या प्रशाला प्र. मुख्याध्यापक ए. एस. पिसे, नामदेव कुंभार प्रशाला समिती सदस्य, अनिल जाधव, कैलास चौधरी, नवनाथ पांढरे, नितिन इंगवले देशमुख, विनोद जाधव, जया गायकवाड, लक्ष्मण लावंड आदी उपस्थित होते.
७५ हजार सिडबाॕल आणि एक शिक्षक एक झाड..
सलग दोन महिने विद्यार्थ्यांनी विविध जातीचे ७५ हजार सिडबाॕल तयार केले. तयार केलेले सिडबाॕल रिकामे माळरान, वन विभाग, कृषि विभागाच्या ताब्यातील जमिनीवर पावसाळ्यात टाकण्यात येतील. तसेच सुमारे ८ फुट उंचीच्या ७५ वृक्षांची “एक शिक्षक, एक झाड” उपक्रम राबवित जंगलवाढीसाठी दिपस्तंभ ठरणारा अभिनव उपक्रम सुरु केला.
सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पुजनाने करण्यात आली. यावेळी प्रशालेतील कु. रुद्रा घाडगे, कु. किर्ती साठे, प्रशालेतील शिक्षिका प्रतिभा राजगुरु यांनी आपल्या मनोगतामधुन स्व. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांचा जिवनपट अलगद उलगडुन दाखविला. तसेच कला, क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रात यशस्वी विद्यार्थ्यांचा पाहुण्यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात संजय गळीतकर यांनी वृक्ष लागवड समस्त प्राणीमात्रांसाठी काळाची गरज आहे. प्रत्येक नागरीकाने सामाजिक बांधिलकी जपत वृक्षलागवडीचा वसा घेतला तरच भविष्यात जिवन आनंदी होईल, असे सांगुन सिड बाॕलची निर्मिती आणि उपयोग याची विस्तृत माहिती दिली.
किरण सुर्यवंशी व नाजिया मुल्ला यांनी सुरेख सुत्रसंचालन केले तर आभार शिवाजी पारसे यांनी मानले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Gastric adenocarcinoma is the most common type of stomach cancer priligy review youtube Finally, a total of 28 studies randomizing 3228 patients were included in the analysis Fig 1 15 17, 22, 35 57
If your physician believes you need surgery for a biopsy to rule out cancer or for removal of a breast tumor, you will be scheduled for a same day procedure [url=https://fastpriligy.top/]amazon priligy[/url]