ताज्या बातम्यासामाजिक

महसूल प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शुभहस्ते अन्नदानाचे वाटप…

महसूल प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम, गोड आणि तिखट यांचा मेळ बसविला भाविकांनी आनंदाने आस्वाद घेतला…

नातेपुते (बारामती झटका)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर देश विदेशातून आषाढी वारीसाठी भाविक भक्त पंढरपूर येथे येत असतात. आषाढी वारीला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने हरिनामाच्या जयघोषात मजल दरमजल करीत येत असतात. सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर माळशिरस तालुक्याच्या धर्मपुरी ग्रामपंचायत हद्दीत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पालखीचे आगमन आज उत्साहपूर्ण भक्तीमय वातावरणामध्ये संपन्न झाले. पालखीचे स्वागत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी केले. यावेळी प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माऊलींच्या पायी वारी पालखी सोहळ्यातील भाविकांसाठी माळशिरस तालुक्यातील प्रशासनाच्या वतीने अन्नदानाचे वाटप सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, निवासी नायब तहसीलदार अमोल कदम, मंडल अधिकारी तलाठी व प्रांत व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महसूल प्रशासनाने भाविकांसाठी स्तुत्य उपक्रम राबविलेला होता. भाविकांसाठी बुंदी व चिवडा गोड आणि तिखट यांचा मेळ केला. पालखी सोहळ्यातील भाविकांना गोड आणि तिखट दोन्हीही चविष्ट असल्याने भाविकांनी आनंदाने आस्वाद घेतला. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील भाविकांना वाटप करण्यात आले. भाविकांना वाटपाचे फोटो उल्का डिजिटल माळशिरस रविराज वाणी यांनी क्षणचित्र टिपलेली आहेत..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button