महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पिसेवाडी गावात ११५ रक्तदात्यांनी केले श्रेष्ठदान…

पिसेवाडी (बारामती झटका)
दि. ०९ एप्रिल २०२५, ग्रामपंचायत कार्यालय, पिसेवाडी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त, पिसेवाडी गावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य, कला क्षेत्रातील प्रमुख मान्यवर-पदाधिकारी व सत्यशोधक प्रतिष्ठान, पिसेवाडी यांच्या आयोजनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ११५ रक्तदात्यांनी रक्तदान करून, सामाजिक उपक्रमास चालना दिली. या शिबिरासाठी माध्यमातून पिसेवाडी गावातील युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गावात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या आनंदात उत्सव साजरा केला जातो. या जयंती सोहळ्यानिमित्त गावातील सर्व क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ व माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
“रक्तदान सर्वश्रेष्ठ दान” हा उपक्रम गेली अनेक वर्ष राबवला जातो. सत्यशोधक प्रतिष्ठान पिसेवाडी यांच्या आयोजनाखाली हे उपक्रम साजरे होतात.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.