१५ हजार शाळांवर टांगती तलवार

१५ ऑक्टोबरपर्यंत समूह शाळांसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना
मुंबई (बारामती झटका)
राज्यातील जवळपास २० पटसंख्येखालील १५ हजार शाळा बंद करून त्या ऐवजी तिथे समूह शाळा तयार करण्याचा विचार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विभागीय उपसंचालकांनी त्यांच्या जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या शाळांचा विचार करून त्यापैकी मोजक्या शाळांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. सुमारे ६५ हजार शाळा या स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालवल्या जातात. मात्र, कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य, सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे निरीक्षण शिक्षण विभागाने नोंदवले आहे.
मुलींचे शिक्षण संपुष्टात येणार
१९६८ साली कोठारी आयोगाने स्कूल कॉम्प्लेक्स योजना राबवण्याची सूचना केली. मात्र, त्यावेळी ती योजना असफल झाली. मात्र, नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये स्कूल कॉम्प्लेक्स योजनेचा पुन्हा एकदा समावेश करण्यात आली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng