कृषिवार्ताताज्या बातम्या

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी यांचा घेतला “पंगा” सरकारने अधिकाऱ्यांना दाखविला “इंगा”

कनिष्ठ अभियंता अँटी करप्शन जाळ्यात, सहाय्यक अभियंता विदर्भात अकोला झोन, तर उपकार्यकारी अभियंता कोकण झोन येथे रवानगी

माळशिरस (बारामती झटका)

भारत देश कृषीप्रधान आहे. जगाचा पोशिंदा बळीराजा याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. नैसर्गिक संकटे त्यामध्ये अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस तर काही वेळेला अवर्षणग्रस्त पावसाने ओढ दिल्यानंतर पिकांना पाणी देण्यासाठी शेततळी, विहीर, बोअर अशा गोष्टींचा वापर करण्याकरता विजेची गरज भासत असते. अशावेळी महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक आर्थिक हेतू ठेवून नाहक त्रास देत असतात.

माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांशी पंगा घेणे अधिकाऱ्यांना चांगले भोगावे लागले आहे. कनिष्ठ अभियंता सदाशिवनगर येथील शाखेत कार्यरत असणारे सुमित साबळे यांना लाच लुचपत अधिकारी यांना पैसे घेत असताना रंगेहात पकडून दिले. तर सरकारकडे वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या तक्रारी व अडचणी सांगून सहाय्यक अभियंता शाखा माळशिरस येथे कार्यरत असणारे संतोष रजपूत यांना विदर्भामध्ये अकोला झोन येथे व माळशिरस उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रवीण कुंभारे यांची तडकाफडकी कोकणात रवानगी केलेली आहे.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी “पंगा” घेतला असल्याने सरकारने अधिकाऱ्यांना “इंगा” दाखविला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

महावितरणचे अधिकारी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवीत नाहीत‌. शासनाकडे आपण नोकरीस आहोत, याचा विसर महावितरणच्या काही अधिकाऱ्यांना झालेला असतो‌. गावातील व तालुक्यातील एजंट यांना हाताला धरून अर्थपूर्ण व्यवहार करून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करीत असतात. तिघांच्या कारवाईमुळे माळशिरस तालुक्यात महावितरणचे अधिकारी अलर्ट झालेले आहेत. काही अधिकारी शेतकऱ्यांचे हित पाहून काम करीत असतात तर काही अधिकारी स्वतःचे हित पाहून काम करतात. अधिकाऱ्यांनी वेळीच सावध होऊन माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना नाहक त्रास व आर्थिक पिळवणूक करू नये. बेजबाबदार व शेतकऱ्यांना लुटणाऱ्या महावितरणचे अधिकारी सरकारच्या रडारवर आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी वेळीच भानावर येऊन शेतकऱ्यांसाठी काम करावे अशी चर्चा शेतकरी वर्गामधून होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. Wonderful insights! The way you break down the complexities is commendable. For additional information on this topic, I recommend visiting: EXPLORE FURTHER. Keen to hear more opinions from the community!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button