महायुती शासनाचा पहिला झटका, ‘एसी’ तील दादा भर उन्हात ‘वेशी’ ते आले

पंढरपूर (बारामती झटका)
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे असलेले मोहिते पाटील यांनी बंड करून लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी लढवली. निवडणूक होताच राज्यातील महायुती शासनाने मोहिते पाटलांचे गटाचे नाक दाबले आणि ‘एसीतील’ ‘दादा’ भर उन्हात’वेशीत’ आले असल्याची चर्चा राजकीय गोटात होत आहे.
निरेच्या पाण्यासाठी आज दुपारी भर उन्हात फलटण येथे आंदोलन केले मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. जलसंपदा विभागाकडून फक्त आश्वासन मिळाले.
माळशिरस सांगोला पंढरपूर या तालुक्यातील काही गावांना नीरेचे पाणी मिळाले नाही. ८ मे तारखेपर्यंत पाणी सुरळीत चालले परंतु, जलसंपदा विभाग निरा उजवा कालव्याच्या अधिकाऱ्यांनी कालव्याला भगदाड पाडले आहे. दुरुस्तीसाठी आम्ही पाणी बंद करत आहोत, त्यासाठी सात ते आठ दिवस लागणार आहे, असे निवेदनाद्वारे जाहीर केले.
या भागातील नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी अकलूज येथे शिवरत्न बंगल्यावर पंढरपूर सांगोला माळशिरस या तालुक्यावर निरेच्या पाण्याचा अन्याय झाला आहे. अजून आम्हाला ८ ते १० दिवस पाणी पाहिजे आहे, असे सांगून आज सोमवारी दुपारी फलटण येथील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा नेण्यात आला होता. यावेळी शेकापाचे नेते बाबासाहेब देशमुख, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संभाजी शिंदे व फलटण येथील काही नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी तेथील अधिकाऱ्याला भाजपचे आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी धारेवर धरले. आमच्या वाट्याचे पाणी आम्हाला द्या. २० मे तारखेपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय कालवा समितीमध्ये झाला होता तो अचानक का बंद केला, असे प्रश्न उपस्थित केले. परंतु अधिकाऱ्यांनी सांगितले की, कालवा दुरुस्ती करण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. त्यासाठी आम्ही ते पाणी बंद केले. कालवा पाच ते सात दिवसात दुरुस्त होईल, ते सांगितले. मात्र पाणी सोडण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारून सांगतो किंवा परत कालवा समितीची बैठक घेण्यात येईल. त्या समितीत ठरले तर पाणी सोडू, असे आश्वासन यावेळी त्यांना देण्यात आले.
एकंदरीतच राज्यातील महायुती शासनाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडवणीस त्यांनी माळशिरसच्या सभेतच सांगितले होते, या पुढील काळात ‘ठोकशाही’ खपवून घेतली जाणार नाही यामुळे हा ‘पहिला झटका’ मोहिते पाटील गटाला दिला असून ‘एसीतले’ दादा ‘वेशीत’ आले असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.