महायुतीचे अधिकृत उमेदवार कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी माळशिरस तालुका एकवटला.
माळशिरस (बारामती झटका)
देशाच्या 19 व्या लोकसभेच्या निवडणुकीत देशात व राज्यात चर्चेत असणाऱ्या माढा लोकसभा मतदार संघात राजकीय समीकरणे बदललेली आहेत. माढा लोकसभा मतदार संघात माळशिरस तालुका येत आहे. या तालुक्यात गत निवडणुकीत कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत शिवरत्नवरील मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधी गट बरोबर होते. या वेळेला मोहिते पाटील व विरोधी गट एकत्र आल्याने माळशिरस तालुक्यातील राजकीय उलथापालथ झालेली होती. तालुक्यामध्ये दोन्ही राजकीय विरोधी असणारे गट एकत्र आलेले असल्याने राजकीय चित्र दिसायला वेगळे दिसत असले तरीसुद्धा महायुतीचे अधिकृत उमेदवार माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी माळशिरस तालुका पुन्हा एकवटलेला पहावयास मिळत आहे. महायुतीतील घटक पक्ष भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष आरपीआय आठवले गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह अनेक पक्ष व संघटना जोमाने कार्य करीत आहेत.
माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पार्टीचा बुद्रुक गट राजकारणात सक्रिय आहे. भाजपमध्ये अनेक जिल्हा परिषद, पंचायत समिती, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे राज्य, जिल्हा, तालुका कार्यकारणी सदस्य आहेत. माळशिरस, नातेपुते नगरपंचायतीमध्ये नगरसेवक यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विकासकामांसाठी भरपूर निधी दिलेला असल्याने अनेक नगरसेवक महायुतीसोबत आहेत. डॉ. आप्पासाहेब देशमुख मित्रपरिवार मोठ्या ताकतीने महायुती सोबत उभा राहिलेला आहे. मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधी गट एकत्र आल्याने नेते व कार्यकर्ते यांना पसंत नव्हते. त्यामुळे माळशिरस तालुका विकास आघाडी निर्माण होऊन महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे.
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे सर्वेसर्वा व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचे सर्व जनसेवक महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करीत आहेत. माळशिरस तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण झटत आहेत. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील रखडलेली निरा-देवधर योजना सुरू होत आहे. इंग्रज कालीन लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वेचा मार्ग, माळशिरस तालुक्यात एमआयडीसी व्हावी, कॉरिडॉरमध्ये गारवाड चा समावेश व्हावा अशा सर्व विकासकामांबरोबर भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी राबवलेल्या योजना अखंडपणे चालू रहाव्यात. माळशिरस तालुक्यात दोन गट एकत्र आल्याने मोठी पोकळी निर्माण होईल, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती. मात्र, तशी परिस्थिती जाणवत नाही. सध्या महायुतीचे अधिकृत उमेदवार कार्यतत्पर पाणीदार खासदार यांच्या विजयासाठी माळशिरस तालुका एकवटलेला आहे. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची टीम माळशिरस तालुक्यात कार्यरत आहे. सर्व गट तट बाजूला सारून एक दिलाने एक मनाने कोणताही श्रेयवाद न करता सर्व खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी झटत आहेत. निश्चितपणे सर्वांच्या सहकार्याने माळशिरस तालुक्यात होणारी पोकळी भरून निघालेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
starzbet
Поиск в гугле