महायुतीच्या कामाच्या जोरावर माळशिरस विधानसभा पुन्हा एकदा भाजप जिंकणार : अजयजी जमवाल

माळशिरस (बारामती झटका)
महायुतीच्या कामाच्या जोरावर माळशिरस विधानसभा पुन्हा एकदा भाजप जिंकणार असल्याचे मत क्षत्रिय संघटन मंत्री अजयजी जमवाल यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी माळशिरस विधानसभा यांच्यावतीने तरंगफळ ता. माळशिरस, येथे विधानसभा पूर्वी नियोजनाची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मध्यप्रदेश व छत्तीसगड क्षेत्रीय संघटनमंत्री अजयजी जमवाल, भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयीन महामंत्री रघुनाथ कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंदजी देशपांडे साहेब, आमदार रामभाऊ सातपुते, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, जिल्हा प्रभारी विक्रम देशमुख, जिल्हा समन्वयक राजकुमार पाटील, के. के. पाटील, सोपानराव नारनवर, आप्पासाहेब देशमुख, बी. वाय. राऊत, हनुमंतराव सूळ, बाळासाहेब वावरे, दादासाहेब उराडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना जमवाल म्हणाले की, विधानसभा क्षेत्रात बूथ मजबुतीकरण करणे गरजेचे आहे. प्रत्येक बुथवर कार्यकर्त्याची फळी निर्माण झाली पाहिजे. यापूर्वी त्यांनी छत्तीसगड व मध्य प्रदेशमध्ये संघटन मंत्री असताना सर्व अंदाज भाजपाचे सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. आता बैठका घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी तालुक्याचा आढावा सांगितला तर, संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी यांनी सरकारच्या योजनेची माहिती सांगितली. त्या योजनेचे लाभार्थी, संमेलन घेणे, योजनेचे मेळावा घेणे अशा प्रकारच्या योजनेचे त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका संयोजक बाळासाहेब सरगर यांनी तर आभार संघटन सरचिटणीस संजय देशमुख यांनी केले.


सोलापूरच्या पराभवाने खचून न जाता बरेच काही शिकून गेलो आहे आता मी पक्षाचा कार्यकर्ता असल्याने पक्ष जो आदेश देईल तो मी शिरसंधान म्हणून विधानसभा निवडणूक भाजप जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावणार आहे. माळशिरस तालुक्यात विकासासाठी दहा हजार कोटी रुपये कामे केली आहेत. – आमदार रामभाऊ सातपुते

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.