महायुतीला मुस्लिम महिलांनीही दिली साथ
मुंबई (बारामती झटका)
राज्यात महायुतीची निर्विवाद सत्ता आली असून मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीत मतदारांचा नवा ट्रेंड समोर आला. ज्या पद्धतीने महायुतीचा विजय झाला, त्यातून महायुतीला मुस्लिम मतदारांनाही जोडण्यात यश आले. विशेष म्हणजे, हे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर आसाम, उत्तर प्रदेशच्या पोटनिवणुकीतही मुस्लिम मतदारांनी भाजप आणि एनडीएच्या बाजूने कौल दिला, त्यामुळे मुस्लिम मतदार आता वोटबँकेचे राजकारण झुगारत असल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांनी भरभरून मतांचे दान दिले. एकूण मतदानाच्या तब्बल 48 टक्क्यांहून अधिक मतदारांनी महायुतीला साथ दिली. विशेष म्हणजे, यावेळी केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिम मतदारांचाही पाठिंबा महायुतीला मिळाला.
राज्यात 20 टक्के मुस्लिम मतदार असलेल्या मतदारसघांची संख्या 38 एवढी आहेत. यातील तब्बल 23 विधानसभा मतदारसंघात भाजप आणि महायुतीने विजय मिळवला आहे, तर केवळ 14 मतदारसंघातच महाविकास आघाडीला यश मिळवता आले आहे. तसेच अवघ्या एका मतदारसंघात एमआयएमला विजय मिळवता आला, तिथेही महायुतीचा उमेदवार नव्हता.
दरम्यान ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानींनी यावेळी अगदी उघडपणे महाविकास आघाडीला मतदान करण्याचे फर्मान काढले होते. पण, असे असतानाही मुस्लिम महिलांनी महायुती आणि भाजपला कौल दिला. त्यामुळेच आता बदलेल्या राजकारणात मुस्लिम मतदारही विकासाभिमुख राजकारणाला पसंती देत असल्याचे समोर येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.