हरभऱ्याच्या झाडावर जाऊन बसलेले जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रतीक्षेत….

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीत फेरबदल झालेले गावगाड्यातील नेते व कार्यकर्ते हरभऱ्याच्या झाडावर…
माळशिरस (बारामती झटका)
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीत राज्याच्या राजकारणात फेरबदल झालेले होते. स्थानिक स्वराज्य संस्था व गावगाड्यातील नेते व कार्यकर्ते यांना राज्यकर्त्यांनी निवडणुकीत वापर करण्याकरता पोकळ आश्वासने देऊन नेते व कार्यकर्ते हरभऱ्याच्या झाडावर बसवून ठेवलेले होते. अनेकजण हरभऱ्याच्या झाडावर जाऊन बसलेले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात दिसत आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडी व महायुतीत राज्याच्या राजकारणात मोठे बदल झालेले होते. त्याचा परिणाम गावगाड्यातील नेते व कार्यकर्ते यांच्यावर करून राज्यकर्त्यांनी अनेक नेते व कार्यकर्ते यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती, नगरपंचायत, नगरपरिषद नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच, सरपंच अशा पदांची आश्वासने दिलेली होती. प्रत्येक वार्डात, गावात, पंचायत समिती गणात व जिल्हा परिषद गणात नगरपंचायत व नगरपरिषद प्रभागात दहा ते पंधरा लोकांना राज्यकर्त्यांनी आश्वासने दिलेली होती. त्यामुळे महायुतीतील महाविकास आघाडीत व महाविकास आघाडीमधील महायुतीत नेते व कार्यकर्ते राज्यकर्त्यांच्या भोळ्या अपेक्षेने निवडणुकीत काम केलेले होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ओबीसी निकालामुळे लांबणीवर पडलेल्या आहेत. हरभऱ्याच्या झाडावर जाऊन बसलेले जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपरिषद व ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत अशी राजकीय परिस्थिती आहे.
वास्तविक पाहता खोटे आश्वासन किंवा स्तुती केल्यानंतर हरभऱ्याच्या झाडाचे उदाहरण समाजामध्ये दिले जाते. हरभऱ्याचे झाड साधारण गुडघाभर किंवा त्याच्या खालीच असते. त्यामुळे हरभऱ्याच्या झाडावर चढणे म्हणजे राज्यकर्त्यांच्या खोट्या स्तुतीला किंवा आमिषाला बळी पडून नेते व कार्यकर्ते यांनी काम केलेले असते. राज्यकर्त्यांनी निवडणुकीत नेते व कार्यकर्ते यांना दिलेला शब्द ते पाळतीलच असे काही नाही किंवा त्यांना पाळणे बंधनकारक सुद्धा नसू शकते. मात्र, निवडणुकीतील शब्द घेऊन नेते व कार्यकर्ते सध्या तरी हरभऱ्याच्या झाडावर जाऊन बसलेले आहेत. ऐनवेळी हरबऱ्याच्या झाडावर बसलेले तसेच बसतील, नवीनच चेहरे जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीत दिसतील कारण शेवटी राजकारण आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.