आरोग्यताज्या बातम्यासामाजिक

माजी आमदार स्व. हनुमंतराव जगन्नाथ डोळस यांच्या परिवाराचा स्तुत्य उपक्रम, निरोगी आयुष्याची नवी दिशा…

वेळापूर (बारामती झटका)

माळशिरस विधानसभेचे माजी आमदार स्वर्गीय हनुमंतराव जगन्नाथ डोळस यांच्या स्मृतीपित्यर्थ स्वर्गीय कलावती जगन्नाथ डोळस चारिटेबल ट्रस्ट दसुर, ता. माळशिरस यांच्या वतीने अध्यक्षा श्रीमती कांचन हनुमंतराव डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते कु. संकल्प हनुमंतराव डोळस यांच्या संकल्पनेतून निरोगी आयुष्याची नवी दिशा शनिवार दि. 17 मे 2025 रोजी सकाळी 09 ते 12 या वेळेत ओंकार मंगल कार्यालय, नाथ मंदिर शेजारी, वेळापूर, ता. माळशिरस, येथे आरोग्य शिबिर 2025 आयोजित करण्यात आले आहे.

आरोग्य शिबिरात मेडिसिन, हृदयरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, अस्थिरोग, सर्जरी, कान, नाक, घसा, मोफत प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीचे आमदार स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांनी माळशिरस तालुक्याच्या सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची दोन टर्म 10 वर्ष अविरतपणे अखंड सेवा केलेली आहे. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचे ते निस्सिम भक्त होते. स्व. हनुमंतराव डोळस यांच्या पश्चात परिवारातील सदस्य धर्मपत्नी श्रीमती कांचन हनुमंतराव डोळस व पुत्र कु. संकल्प हनुमंतराव डोळस यांनी अखंडपणे सामाजिक कार्य सुरू ठेवलेले आहे. सामाजिक बांधिलकी जपत सध्या आरोग्य शिबिराची काळाची गरज ओळखून स्व. हनुमंतराव डोळस परिवार यांनी स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केलेले आहे. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेतून स्वागत केले जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button