माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गायकवाड परिवार यांची सांत्वन पर भेट घेतली…
अकलूज (बारामती झटका)
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी अकलूज येथील श्रीमती समाबाई हरी गायकवाड यांच्या परिवारांची सांत्वन पर भेट घेतली. यावेळी माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे निमंत्रित प्रांतिक सदस्य डॉ. आप्पासाहेब देशमुख, भारतीय जनता पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष महादेवराव कावळे, युवा नेते प्रवीण उर्फ पंप्पूशेठ भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राहुल ढेरे, सचिनदादा मोरे, सचिन शेंडगे आदी उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोकराव गायकवाड यांच्या मातोश्री श्रीमती समाबाई हरी गायकवाड यांचे वयाच्या 93 व्या वर्षी अल्पशा आजाराने सोमवार दि. 13 जानेवारी 2025 रोजी दुःखद निधन झालेले होते. गायकवाड परिवार यांच्या निवासस्थानी आवर्जून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट दिली. श्रीमती समाबाई गायकवाड यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून त्यांना अभिवादन केले. गायकवाड परिवार यांच्या दुःखामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सहभागी झालेले होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.