कृषिवार्ताताज्या बातम्याराजकारणसामाजिक

माजी सहकार मंत्री आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला…..

गावचा विकास करून गाव समृद्ध झाले पाहिजे व शेतकऱ्यांचा विकास होऊन शेतकरी सधन झाला पाहिजे – आ. सुभाषबापू देशमुख

पंढरपूर (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी यांचा संयुक्त मेळावा 09 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाला.

आ. सुभाषबापू देशमुख यांनी पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या ठिकाणी माळशिरसकरांचा मेळावा घेतला. यामध्ये माळशिरस तालुक्यातील 40 ते 50 गावांचा सहभाग होता. गावचा सर्वांगीण विकास करणे, त्या गावातील तरुणांच्या हाताला काम मिळवणे तसेच गावातील अनेकांना सामावून घेऊन गावाचा विकास कसा होईल यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

शेती संदर्भात शेतीचे उत्पादन कसे वाढेल, त्याची विक्री व्यवस्था कशी होईल तसेच आपल्या गावात काही वस्तू तयार होतात तर त्याचे मार्केटिंग कसे करता येईल, असे अनेक व्यवसाय संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. तसेच माळशिरस तालुक्यात फलटण-पंढरपूर रेल्वेचा प्रश्न, एमआयडीसीचा प्रश्न, निराधार देवधर पाण्याचा प्रश्न अशा सर्व विषयांवर चर्चा झाली.

आपले गाव कसं समृद्ध होईल, याचं लोकांना मार्गदर्शन केलं. अशा प्रकारे आज 40 ते 50 गावातील सरपंच, सदस्य तसेच सोसायटी चेअरमन, संचालक तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, समाजसेवक, तरुण वर्ग, शेतकरी बांधव अशा लोकांचा सुभाषबापू देशमुख यांनी मेळावा घेतलेला होता. उपस्थित कार्यकर्त्यांना सुभाषबापूंनी योग्य दिशा देण्याचे मार्गदर्शन केलेले असल्याने उपस्थित तरुण वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button