माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्यातून आप्पासाहेब रुपनवर पाटील यांचा शेतकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम…
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, उपसभापती बापूराव उर्फ मामासाहेब पांढरे, पंचायत समिती सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील यांच्या शुभ हस्ते शुभारंभ होणार…
नातेपुते (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विशेष सहकार्यातून खास शेतकऱ्यांसाठी 50% सवलतीच्या दरात औषध फवारणी बॅटरी पंप व वॉटर फिल्टर वाटप कार्यक्रमाचे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक डोंबाळवाडी कुरबावी गावचे युवा नेते मारुतराव उर्फ आप्पासाहेब रुपनवर पाटील यांनी आयोजन केलेले आहे.
औषध फवारणी बॅटरी पंप व वॉटर फिल्टर वाटप शुभारंभ गुरुवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 09 वाजता अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड, नातेपुते येथे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बापूराव उर्फ मामासाहेब पांढरे, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दि. 15 ऑगस्ट पासून 22 ऑगस्ट 2024 पर्यंत शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी राहणार आहे. औषध फवारणी बॅटरी पंप, सिंगल मोटार पंप मार्केटमध्ये 3,490 रुपये किंमत आहे तो, 1,649 रुपयाला मिळणार आहे. वॉटर फिल्टर 12,999 रुपये किंमत आहे 4,599 रुपयाला मिळणार आहे. तरी शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. औषध पंप मोटर बॅटरीसाठी सहा महिने गॅरेंटी राहील. वॉटर फिल्टर फिटिंग चार्जेस अतिरिक्त स्वरूपात देणे बंधनकारक राहील.
सदरच्या 50% सवलतीच्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड किंवा रेशन कार्ड झेरॉक्स, एक फोटो घेऊन यावे, असे आयोजक श्री. मारुतराव उर्फ आप्पासाहेब रुपनवर पाटील यांनी शेतकरी बांधवांना लाभ घेण्याचे आवाहन केलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.