अकलूज येथे मकर संक्रातीच्या शुभ मुहूर्तावर द लेजंड्स युनीसेक्स सलून चा उद्घाटन सोहळा संपन्न होणार
डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते तर हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार संपन्न
अकलूज (बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस, येथे मकर संक्रातीच्या शुभमुहूर्तावर द लेजंड्स युनीसेक्स सलून चे उद्घाटन दि. १४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वा. या शुभमुहूर्तावर सोमरत्न मार्केट गुळवेनगर, अकलूज येथे संपन्न होणार आहे. या शॉपचे उद्घाटन डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते तर प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तर यावेळी सतीश नाना पालकर, राजाभाऊ गुळवे, अण्णासाहेब इनामदार, दत्तात्रय गुळवे, अण्णासाहेब शिंदे, चंद्रशेखर गुळवे, नवनाथ साठे,, सुधीर रास्ते, मयूर माने, रणजीतसिंह देशमुख, सुदर्शन आबा मिसाळ आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. तरी या भव्य उद्घाटन समारंभ सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन शहाजी आगाडे व प्रसाद शहाजी आगाडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.