माळेवाडी अकलूज येथे जेष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू.

अकलूज (बारामती झटका)
माळेवाडी-अकलूज येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूर यांच्या वतीने अकलूज ग्रामपंचायतीचे लोकप्रिय माजी सरपंच तथा युवकांचे ह्रदयसम्राट शिवतेजसिंह (शिवबाबा) मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन सौ. देवन्या शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सौ. देवन्या मोहिते-पाटील म्हणाल्या की, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने मोफत जेष्ठ नागरिकांसाठी वाचनालय सुरू केलेला उपक्रम हा स्तुत्यपर असून वयोवृद्धांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण ठरणार आहे. या वाचनालयमुळे त्यांच्या आनंदात व ज्ञानात भर पडणार आहे.


यावेळी अंधश्रद्धा निर्मुलनचे व्याख्याते व वनस्पती शास्त्र विभागाचे माजी प्रा. रामलिंग सावळजकर, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूरचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कडबाने, ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत नायकुडे, पत्रकार लक्ष्मीकांत कुरूडकर, पत्रकार संजय लोहकरे, सुनील कांबळे, विशाल साठे, सचिन झेंडे, अनुराग खंडागळे, पृथ्वीराज कारंडे, प्रकाश भोसले, लालुभाई शेख, बल्लू देशमुख, विजय सुर्यवंशी, रघुनाथ देशमुख, अण्णासाहेब जगदाळे, दादा थीटे, अशोक कोळी, सुनिल कांबळे, विशाल साठे, पृथ्वीराज कारंडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत कडबाने यांनी केले तर आभार प्रदर्शन सोमनाथ खंडागळे यांनी मानले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.