मळगाव (सावंतवाडी-सिंधुदुर्ग) घाटीतील रस्त्यावरील मोरीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी…….
तिरोडा (बारामती झटका)
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) मळगाव घाटीतील रस्त्यावर ठिकठिकाणी मातीचा भराव टाकण्यात आल्यामुळे वाहनधारकांनी त्यावरून वाहन ये-जा करताना काळजी घ्यावी, असे आवाहन सावंतवाडी (सिंधुदुर्ग) तालुक्यातील तिरोडा गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक श्री. दिनेश शांताराम मयेकर यांनी केले असून दरम्यान त्या ठिकाणी सावंतवाडी-शिरोडा महामार्ग असल्या कारणाने स्थानिक जनतेची व वाहनधारकांची मागणी लक्षात घेता उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.
मळगाव घाटीतील ब्रिटिशकालीन मोरी खचल्यामुळे त्या ठिकाणावरून काम करण्यासाठी रस्ता बंद ठेवून एकेरी वाहतूक चालू ठेवण्यात आली असून सदर घाटीतील काम युद्धपातळीवर सुरु आहे. तसेच वाहन धारकांची मागणी लक्षात घेता या महामार्गांवरून निदान प्रवास करण्यासाठी मातीचा भराव टाकून वाहने ये-जा करण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा. अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. तरी त्यामुळे या ठिकाणावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी काळजीपूर्वक व लक्षपूर्वक वाहने चालवावीत. तर स्वतःच्या जीवावर बेतून अन्य कोणत्याही वाहनचालकाला आपल्याकडून कोणतीही जीवित हानी व त्रास होणार नाही. याची दक्षता घ्यावी.
सावंतवाडी बांधकाम विभागाने या घाटीतील रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून तसेच सदर घाटीतील मार्गांवर दूतर्फा लोखंडी जाळी किंवा भिंत बांधून दिवसेंदिवस वाढत चाललेले अपघात वेळीच थांबवावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. तसेच सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा येथील सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक श्री. दिनेश शांताराम मयेकर यांचा सदर मळगाव घाटीतील रस्त्यावरील कामकाजाबद्दल पाठपुरावा लवकरात लवकर मंजूर करावा.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Noodlemagazine Hi there to all, for the reason that I am genuinely keen of reading this website’s post to be updated on a regular basis. It carries pleasant stuff.