हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू, राहुल कानगुडे

करमाळा (बारामती झटका)
समाजकारणातुन राजकारण करणाऱ्या शिवसेना पक्षाच्यावतीने गोरगरीब सर्वसामान्य जनतेला तात्काळ आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख महेश चिवटे, वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश दादा चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यासाठी शिवसेनेच्या वतीने मोफत ॲम्बुलन्स सेवा सुरु करण्यात आली आहे. याचा लाभ घ्यावा, असे मत शिवसेना विधानसभा अध्यक्ष राहुल कानगुडे यांनी व्यक्त केले.
याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, करमाळा तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेचे काम चांगले चालु असुन जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यात शिवसेना भक्कमपणे उभी राहिली आहे. गोरगोरीब सर्वसामान्य जनतेला तात्काळ आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी करमाळा तालुक्यात मोफत ॲम्बुलन्स सेवा सुरु करण्यात आली असून यामध्ये फक्त इंधन व ड्रायव्हर भत्ता पेशंटकडुन घेण्यात येणार आहे. तरी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन राहुल कानगुडे यांनी ॲम्बुलन्स मोफत सेवा लोकार्पण सोहळा प्रसंगी व्यक्त केले आहे.

आरोग्याबाबत तात्काळ सेवेसाठी सचिन कानगुडे – 9767407937, नागेश चेंडगे – 9309703938, विशाल कानगुडे – 9112467807 यांच्याशी संपर्क साधावा. या लोकार्पण सोहळा प्रसंगी राहुल कानगुडे, आप्पासाहेब गणेशकर, लखन शिंदे, सतिश कानगुडे, गोरख पवार, बापू कानगुडे, बाळू शिंदे, नितीन कानगुडे, सोमा साळवे, सचिन कानगुडे, स्वप्निल कानगुडे, कैलास बीचित्कार, अण्णासाहेब शिंगाडे, नितीन दामोदर, नाना कानगुडे, विकास राखुंडे, प्रफुल्ल दामोदरे, अमोल रांखुडे, श्रीकांत गोसावी, चांदणे, लखन आवटे, राज शेख, दादा फुके, सुनील कानगुडे, रवींद्र कानगुडे आदींसह करमाळा तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते व देवळाली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेच्यावतीने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येणार असून त्या ठिकाणी मोफत चष्मे, मोफत औषध देण्यात येणार आहेत. ज्या गावात आरोग्य शिबिर घ्यायचे आहेत त्या गावातील कार्यकर्त्यांनी करमाळा येथील जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख देवानंद बागल व शहर प्रमुख नागेश काळे यांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



