माळीनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ

रंजनभाऊ गिरमे यांच्या शुभहस्ते नारळ फोडून प्रचार सुरु…
माळीनगर (बारामती झटका)
माळीनगर, (ता.माळशिरस) येथे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या उमेदवारांच्या प्रचाराचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
माळीनगर कारखान्याचे चेअरमन रंजनभाऊ गिरमे यांच्या हस्ते प्रचाराचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस अमित टिळेकर, डॉ. प्रवीण पताळे आदींसह उमेदवार नागेश तूपसौंदर्य, विजय खंडागळे आणि ऋतुजा विक्रम पराडे आदी उपस्थित होते.
यावेळी रंजनभाऊ गिरमे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येतील, अशा प्रकारे पक्षाचा प्रचार करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन करून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी अमित टिळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी खंडाळी गावचे माजी सरपंच बाबुराव पताळे यांचे चिरंजीव अमोल पताळे, सुभाष गोसावी, राहुल रोकडे आदी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, माळीनगरमधून भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देऊ, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महादेव कावळे आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



