माळीनगर येथील वार्षिक स्नेहसंमेलन व माळीनगर फेस्टिवलचे उद्घाटन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार

माळीनगर येथे दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन व माळीनगर फेस्टिवलचे आयोजन
माळीनगर (बारामती झटका)
दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड माळीनगर, दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी, माळीनगर विकास मंडळ, शुगरकेन सोसायटी, महात्मा फुले पतसंस्था माळीनगर, दि मॉडेल विविधांगी प्रशाला, गुलमोहर इंग्लिश स्कूल व प्राथमिक शाळा क्र. १ ते ५ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेच्या प्रांगणात दि. २ डिसेंबर २०२३ ते दि. ५ डिसेंबर २०२३ या कालावधीत विद्यार्थ्यांचे ‘वार्षिक स्नेहसंमेलन’ व ‘माळीनगर फेस्टिवल’ चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलचे उद्घाटन माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते आज सायं. ६ वा. उद्घाटन होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शाळेच्या प्रांगणात विविध संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये प्रशालेतील १७०० विद्यार्थी सहभाग घेतात. तसेच विद्यार्थ्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून प्रशालेच्या प्रांगणात विविध खेळणी उभारण्यात आलेली आहेत. तसेच खाद्यपदार्थ, ज्वेलरी इत्यादींचे ११० स्टॉल उभारले आहेत. अशा प्रकारे वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करण्यात येत आहे.
तरी माळीनगर व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या वार्षिक स्नेहसंमेलनाचा आणि माळीनगर फेस्टिवलचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.