ताज्या बातम्या

माळीनगर येथील महात्मा फुले पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत व उत्साहात संपन्न

संस्थेचे चेअरमन राजेंद्र उर्फ रंजन भाऊ गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर…

माळीनगर (बारामती झटका)

माळीनगर ता. माळशिरस येथील महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था माळीनगर या संस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभासदांना १५ टक्के लाभांश (डिव्हीडंड) देण्यात येणार असल्याचे संस्थेचे व्हा. चेअरमन महादेव एकतपुरे यांनी यावेळी जाहीर केले.

म. फुले पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे वाटचाल करीत असलेल्या या पतसंस्थेच्या सभेचे शुक्रवार दि. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. सौभाग्य मंगल कार्यालय, माळीनगर येथे या आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हा. चेअरमन महादेव एकतपुरे हे होते. प्रारंभी क्रांतीसुर्य म. फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सभासद विजय नेवसे व मिलिंद गिरमे यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक किरण गिरमे, अंकुश फुले, निळकंठ भोंगळे, चंद्रकांत जगताप, सुरज वाघमोडे, कृष्णा भजनावळे तसेच माळीनगर साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश गिरमे, व्हा. चेअरमन राहुल गिरमे, विशाल जाधव, निखिल कुदळे, शुगरकेनचे चेअरमन अमोल गिरमे, व्हा. चेअरमन कपिल भोंगळे, सुरेंद्र बधे, सुरेश राऊत, मनीष रासकर, सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी प्रकाश गिरमे, व्हा. चेअरमन नितीन इनामके, खजिनदार पृथ्वीराज भोंगळे, संचालक अजय गिरमे, दिलीप इनामके, माळीनगर मल्टिस्टेटचे संचालक बाळासाहेब सोनवणे, प्राचार्य प्रकाश चवरे, पर्यवेक्षक रितेश पांढरे, राजीव देवकर, सुनील जवरे आदी सभासद उपस्थित होते.

यावेळी पतसंस्थेचे सचिव योगेश कचरे यांनी सभेपुढील विषय तसेच ताळेबंदाचा आढावा घेतला. यामध्ये पतसंस्थेची स्थापना १९९४ साली झाली असून सभासद ५३० एवढे आहेत. संस्थेचे भाग भांडवल १ कोटी ३ लाख ८३ हजार एवढे आहे. संस्थेत १७ कोटी २९ लाख २६ हजार रुपये ठेवी असून खेळते भांडवल ३२ कोटी १५ लाख आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल १६७ कोटी असून कर्ज वसुली ७८.३५ टक्के एवढी आहे. संस्थेचा तरतूदपूर्व नफा १ कोटी ७१ लाख व निव्वळ नफा ५८ लाख ७७ हजार एवढा असून संस्थेला ‘अ’ ऑडिट वर्ग मिळाला असल्याचे श्री. कचरे यांनी सांगितले.

यावेळी सभासदांनी अहवाल व ताळेबंदावर विचारलेल्या प्रश्नांना संस्थेचे व्हा. चेअरमन महादेव एकतपुरे व सचिव योगेश कचरे यांनी समाधानकारक उत्तरे दिली. सभासदांना पतसंस्थेच्यावतीने एक मोठी प्रवासी बॅग भेट देण्यात येणार असून त्याचे वाटप २० सप्टेंबरपासून करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर केले. सभा यशस्वी करण्यासाठी सचिव योगेश कचरे, हमीद कोरबू, ज्ञानेश्वर व्यवहारे, युवराज कापले, सनी भुजबळ, सूरज घोगरे, योगेश म्हेत्रे, सागर गिरमे, अन्वर काझी यांनी परिश्रम घेतले. यावेळी संचालक सूरज वाघमोडे यांनी सर्वांचे स्वागत केले तर शेवटी व्हा. चेअरमन महादेव एकतपुरे यांनी आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

4 Comments

  1. I found this article both enjoyable and educational. The points made were compelling and well-supported. Let’s talk more about this. Check out my profile for more interesting reads.

  2. I came across your site wanting to learn more and you did not disappoint. Keep up the terrific work, and just so you know, I have bookmarked your page to stay in the loop of your future posts. Here is mine at ZH5 about Thai-Massage. Have a wonderful day!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button