माळीनगर येथील मॉडेल विविधांगी प्रशालेच्या २००९ बॅच च्या बारावी आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

दि. सा. मा. शु. फॅ. लि. चे चेअरमन राजेंद्र गिरमे व माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार संपन्न
माळीनगर (बारामती झटका)
माळीनगर, ता. माळशिरस येथील मॉडेल विविधांगी प्रशालेच्या सन 2009 च्या बारावी आर्ट्स च्या सर्व विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. १४/९/२०२५ रोजी मॉडेल विविधांगी प्रशाला माळीनगर संगीत विभाग इमारत येथे करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमावेळी प्रमुख उपस्थितीत दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड माळीनगरचे चेअरमन राजेंद्र गोपाळराव गिरमे व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे असणार आहे.

दि. १४/९/२०२५ रोजी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत सर्व २००९ च्या बारावी आर्ट्स च्या सर्व विद्यार्थ्यांचे आगमन होणार आहे. ११ते ११.३० दरम्यान स्मारकाची पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर ११.३० ते १२ पाहुण्यांचे आगमन व सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते १ उपस्थितांचा परिचय असणार आहे.
तसेच दुपारी १ ते २ भोजन देखील असणार आहे. त्यानंतर २ ते ४ गुणदर्शन, आभार व समारोप असा कार्यक्रम असणार आहे.

तरी सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मॉडेल विविधांगी प्रशाला माळीनगर च्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



