मल्लसम्राट रावसाहेबआप्पा मगर, बळीराजा प्रतिष्ठान व पै. दत्ताभैया मगर मित्रपरिवार यांच्यावतीने युवराज केचे यांना आदर्श कुस्ती निवेदक पुरस्कार

निमगाव (म.) (बारामती झटका)
दि. 15 सप्टेंबर 2024 रोजी मल्लसम्राट रावसाहेब आप्पा मगर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मगराचे निमगाव ता. माळशिरस, जि. सोलापूर, येथे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक कुस्ती मैदान पार पडले. संपूर्ण महाराष्ट्रातून रावसाहेब आप्पा मगर यांच्यावरती प्रेम करणारे कुस्ती शौकीन हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज पैलवान या कुस्ती मैदानामध्ये लढले.
या कुस्ती मैदानाचा खास विशेष आकर्षण बळीराजा प्रतिष्ठान यांच्यावतीने आदर्श कुस्ती निवेदक पुरस्कार देऊन कुस्ती निवेदक युवराज केचे यांना सन्मानित करण्यात आले. 2008 पासून युवराज केचे यांनी कुस्ती निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 1000 पेक्षा जास्त कुस्ती मैदान आपल्या वाणीतून यशस्वीरित्या पार पाडले. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यामध्ये कुस्तीला अस्तित्व आहे. जरी आज कितीतरी कुस्ती शौकिनांनी युवराज केचे ही व्यक्ती पाहिली नाही, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून युवराज केचे यांचा आवाज सर्व परिचित आहे.
कुस्ती क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक गरजू पैलवानांच्या अडचणी आणि कुस्ती मैदानच्या आयोजकांना सहकार्य, कुस्ती वाढली पाहिजे, कुस्ती टिकली पाहिजे, यासाठी कार्यक्षम असणार नेतृत्व म्हणून युवराज केचे यांच्याकडे पाहिलं जातं. बळीराजा प्रतिष्ठान यांच्यावतीने पैलवानांचं गाव म्हणून महाराष्ट्रभर ओळख असणारे मगराचे निमगाव आणि या गावांमध्ये पुरस्कार मिळणे हे खऱ्या अर्थाने नशीबवानाचं काम असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही. केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून मल्लसम्राट रावसाहेब आप्पा मगर आणि बळीराजा प्रतिष्ठान व पैलवान दत्ता भैया मगर मित्रपरिवार यांच्यावतीने युवराज केचे यांना आदर्श कुस्ती निवेदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.