मळोली गावचे बाबुराव रावसाहेब जाधव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे स्वर्गीय बाबुराव जाधव सेवानिवृत्त शेतकी अधिकारी होते..
मळोली (बारामती झटका)
मळोली गावचे कै. बाबुराव रावसाहेब जाधव यांचे सोमवार दि. २५/८/२०२५ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सध्या महुद (बु.), ता. सांगोला येथे मुलगा डॉ. बाळासाहेब उर्फ उदयसिंह जाधव यांच्याकडे वास्तव्यास होते. त्यांच्यावर महूद येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचा रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम महूद येथील वैकुंठ स्मशानभूमी बुधवार दि. २७/८/२०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता होणार आहे.

कै. बाबुराव रावसाहेब जाधव यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना यशवंतनगर अकलूज येथे बरीच वर्ष मुख्य शेतकी अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच त्यांनी श्री शंकर सहकारी सदाशिवनगर, आदिनाथ, सहकारी साखर कारखाना मकाई, सहकारी साखर कारखाना श्री समर्थ साखर कारखाना अंबड, जालना इत्यादी ठिकाणी मुख्य शेतकी अधिकारी म्हणून काम पाहिले. कै. बाबुराव काका यांच्या दुःखद निर्णयाने जाधव परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. जाधव परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व स्वर्गीय बाबुराव काका यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



