मळोली गावात महायूतीचे आ. राम सातपुते यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांची होम टू होम प्रचारास सुरुवात..
मळोली (बारामती झटका)
माळशिरस विधानसभा 254 अनुसूचित जाती मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या विजयासाठी मळोली गावातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांची होम टू होम प्रचारास सुरुवात झालेली आहे. मळोली व मळोली पंचक्रोशीतील प्रत्येक घरात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केलेली आहे.
कार्यकर्त्यांनी चार-पाच लोकांचे शेकडो ग्रुप तयार केलेले आहेत. मतदारांपर्यंत पोहोचून माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये केलेला विकास व नरेंद्रजी मोदी सरकारने व महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सरकारने शेतकरी, महिला भगिनी, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी योजना राबवून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिलेला आहे.
आजपर्यंत केलेल्या विकास कामांची यादी व केंद्र व राज्य सरकारने केलेल्या जनतेच्या योजना घरोघरी पोहोचवण्याचे काम मळोली गावातील आमदार राम सातपुते यांच्यावर प्रेम करणारे सर्व जाती-धर्मातील लोकांची घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात झाली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Excelente artículo, me ha dado una nueva perspectiva sobre el tema. Muy bien explicado.