सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा जाहीर

पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्ह्यासह सातारा, सांगली जिल्हा दौरा
सोलापूर (बारामती झटका)
ग्रामविकास व पंचायत राज, महाराष्ट्र राज्य तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा सोमवार, दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजीचा सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्हा जाहीर झाला आहे.
सदरचा दौरा पुढीलप्रमाणे –
सोमवार, दि. २५.०८.२०२५ रोजी सकाळी ०८.३० वा. ‘कमलकुंज’ निवासस्थान बोराटवाडी, ता. माण येथून मोटारीने दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगलीकडे प्रयाण, १०.०० वा. दिघंची येथे आगमन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक लोकार्पण सोहळा समारंभास उपस्थिती. (स्थळ – दिघंची हायस्कूल दिघंची ता. आटपाडी, जि. सांगली), दुपारी ११.१५ वा. दिघंची येथून मोटारीने म्हसवड, ता. माण, जि. साताराकडे प्रयाण, १२.०० वा. म्हसवड येथे आगमन व श्री. विलास देशमुख यांचे पुतणे चि. किरण व चि. सौ. कां. साक्षी यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ – सीताराम मल्टीपर्पज हॉल दिवड पाटी), १२.१५ वा. म्हसवड येथून सोलापूरकडे प्रयाण, ०२.३० वा. शासकीय विश्रामगृह सोलापुर येथे आगमन व राखीव, ०२.४५ वा. शासकीय विश्रामगृह येथून महात्मा गांधी प्राणी संग्रहालय, सोलापूरकडे प्रयाण, ०३.०० वा. महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथे आगमन व विविध विकास कामांचा शुभारंभास उपस्थिती, ०३.४५ वा. महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथून जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूरकडे प्रयाण, ०४.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व जिल्हास्तरीत क्रीडा संकुल समिती सभा. (स्थळ – नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर), सायं. ०४.३० वा. जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक. (स्थळ – नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर), ०५.०० वा. शहरातील विविध विकास कामांबाबत चर्चा. (स्थळ – नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर), ०५.३० वा. सोलापूर येथून मोटारीने कवठेमहांकाळ, जि. सांगलीकडे प्रयाण, ०७.३० वा. कवठेमहांकाळ येथे आगमन व दहीहंडी उत्सव समारंभास उपस्थिती व राखीव. (स्थळ – श्री महाकाली हायस्कूल, विद्यानगर, कवठेमहांकाळ, जि. सांगली) (संदर्भ- श्री. संदीप गिड्डे, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस, ९६६५४७४८१४)


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



