ताज्या बातम्या

मळोली येथील अरुणसिंह फत्तेसिंह जाधव उर्फ अरुण अण्णा यांचे अपघाती दुःखद निधन…

मळोली (बारामती झटका)

मळोली ता. माळशिरस, येथील अरुणसिंह जाधव उर्फ अरुणअण्णा यांचे वयाच्या 50 व्या वर्षी गुरुवार दि. 27/06/2024 रोजी रात्री अपघाती दुःखद निधन झालेले आहे.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय असा परिवार आहे. मनोजकुमार फत्तेसिंह जाधव यांचे लहान बंधू तर पंचायत समितीचे सदस्य रणजीतसिंह जयसिंगराव जाधव यांचे चुलत बंधू होते.

त्यांच्यावर शुक्रवार दि. 28/06/2024 रोजी सकाळी 8.30 वाजता मळोली येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहेत.

स्वर्गीय अरुणअण्णा यांच्या मृतात्म्यास शांती लाभो व जाधव परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

5 Comments

Leave a Reply

Back to top button