मळोली येथील कुमारी संतोषी महादेव वाघमारे हिचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू

मळोली (बारामती झटका)
मळोली ता. माळशिरस, येथील इयत्ता दहावी मधील कुमारी संतोषी महादेव वाघमारे हिचे उष्माघाताने वयाच्या सोळाव्या वर्षी शनिवारी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तिच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.
कुमारी संतोषी वाघमारे ही मळोली येथील जनता विद्यालयामध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. तिने दहावीच्या बोर्डाची परीक्षा दिलेली आहे. गेल्या आठवड्यामध्ये अचानक तापमान वाढलेले असल्याने गुरुवारी कुमारी संतोषी हिला त्रास जाणू लागला. घरातील नातेवाईकांनी तिला दवाखान्यात नेले. सलाईन व औषध उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी तिची प्राणज्योत मावळली आहे. प्रतिकूल परिस्थितीत आई-वडिल तिचे शिक्षण करत होते.
कुमारी संतोषी हुशार व संयमी मुलगी होती. अचानक दुर्दैवी मृत्यू झाल्याने वाघमारे परिवारावर दुःखाची छाया पसरलेली आहे. कालकथीत संतोषी हिच्या आत्म्यास शांती लाभो व वाघमारे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.