मळोली येथील प्रगतशील बागायतदार स्वर्गीय गजेंद्र महादेव काळे यांचा दशक्रिया विधी संपन्न होणार…

दै. सकाळचे प्रतिनिधी प्रकाश काळे यांना पितृशोक…
मळोली (बारामती झटका)
मळोली ता. माळशिरस, येथील प्रगतशील बागायतदार स्वर्गीय गजेंद्र महादेव काळे यांचा दशक्रिया विधी मंगळवार दि. 10/09/2024 रोजी सकाळी 08 वाजता मळोली (दर्गा) ओढ्याजवळ होणार आहे.
स्व. गजेंद्र महादेव काळे यांचे वयाच्या 88 व्या वर्षी अल्पशा आजाराने रविवार दिनांक 01/09/2024 रोजी दुःखद निधन झालेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दै. सकाळचे मळोली प्रतिनिधी श्री. प्रकाश काळे यांचे ते वडील होते.
स्व. गजेंद्र काळे यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपला संसार केलेला आहे. मुलांच्या सहकार्याने शेती, दुग्ध व्यवसाय यामधून काळे परिवाराने आपली आर्थिक प्रगती केलेली आहे.

स्व. गजेंद्र काळे उर्फ नाना यांच्या दुःखद निधनाने काळे परिवार यांच्यावर दुःखाच्या डोंगर कोसळलेला आहे. काळे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व नानांच्या मृतात्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.