ताज्या बातम्या

मळोली येथील सौ. चंद्रकला बाबुराव जाधव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…..

सहकार महर्षी साखर कारखान्याचे माजी मुख्य शेती अधिकारी श्री. बाबुराव रावसाहेब जाधव यांना पत्नी वियोग….

मळोली (बारामती झटका)

मळोली ता. माळशिरस, येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी मुख्य शेतकी अधिकारी श्री. बाबुराव रावसाहेब जाधव यांच्या धर्मपत्नी सौ. चंद्रकला बाबुराव जाधव यांचे अल्पशा आजाराने बुधवार दि. 18/09/2024 रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

धैर्यशील व डॉक्टर उदय जाधव यांच्या त्या मातोश्री होत्या. सध्या डॉ. उदय जाधव महूद ता. सांगोला, येथे वास्तव्यास आहेत. स्व. सौ. चंद्रकला जाधव यांच्यावर अंतिम संस्कार दि. 19/09/2024 रोजी सकाळी 9.30 वाजता महूद ता. सांगोला, येथील स्मशानभूमीत होणार आहे.

त्यांच्या दुःखद निधनाने जाधव परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो आणि मृतात्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button