मळोली येथील वासुदेव चंद्रकांत पवार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन..

मळोली (बारामती झटका)
मळोली ता. माळशिरस, येथील वासुदेव चंद्रकांत पवार यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवार दि. ३ मार्च २०२५ रोजी सकाळी ७ वा. दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे.
वासुदेव चंद्रकांत पवार यांचे मुळगाव इस्लामपूर आहे. मळोली येथे बऱ्याच वर्षांपासून मामांच्या गावाला मळोली येथे रामराजे काळे मामा यांच्या निवासस्थानाशेजारी वास्तव्य होते. सध्या वेळापूर येथील बनकर यांच्या साई लॉज येथे मॅनेजर म्हणून होते. त्यांच्यावर मळोली येथील वैकुंठ स्मशानभूमीत १०.३० वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या दुःखद निधनाने इस्लामपूर व मळोली गावावर दुःखाची शोककळा पसरली आहे. वासुदेव पवार यांच्या आत्म्यास शांती लाभो व पवार परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.