ताज्या बातम्यासामाजिक

माळशिरस मध्ये सुप्रभात ग्रुपचे फॅमिली गेट-टुगेदर उत्साहात साजरे


माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस शहरामध्ये काही मित्रांनी १५ वर्षांपूर्वी मिळून मॉर्निंग वॉक चालू केला होता व त्या ग्रुपला सुप्रभात ग्रुप असं नाव दिलं होतं. या ग्रुपमध्ये जशी जशी वर्ष सरत गेली तशी तशी या सुप्रभात ग्रुपमध्ये सभासदांची संख्या देखील वाढत गेली. आणि ती संख्या आता तब्बल ३० लोकांची झालेली आहे.

या ग्रुप मध्ये शहरांमधील अनेक क्षेत्रातील मंडळी आहेत. जसे की, व्यापारी असेल, नोकरदार असेल, शासकीय कर्मचारी असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, शिक्षक वर्ग असेल अशा प्रत्येक क्षेत्रातील मंडळी आहेत. आता हा ग्रुप, ग्रुप न राहता आता ते एक प्रशस्त कुटुंब झालेलं आहे.

या सुप्रभात ग्रुपमधील मित्रांचे गेट-टुगेदर या आठवड्यात होते. पण फॅमिली गेट-टुगेदर करण्याची एक भन्नाट कल्पना या सुप्रभात ग्रुपमधील सदस्यांच्या मनामध्ये आली व त्यांनी ती कल्पना आज सत्यात उतरवली. या गेट-टुगेदर मध्ये फक्त जोडीदार आणता कुटुंबातील सर्व सदस्यांनी या गेट-टुगेदर साठी हजर राहायचं हे ठरलं होतं. आणि त्याप्रमाणे झाले देखील. या गेट-टुगेदर मध्ये महिलांचे व मुलांचे फनी गेम्सही झाले. त्यामध्ये विजेत्यांना बक्षीसेही मिळाली. या सर्व कार्यक्रमानंतर सर्व कुटुंबाला सस्नेह भोजनाचा आस्वाद देखील घेता आला.

सध्याच्या काळात आपलीच लोक आपल्याला विसरत असताना अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे, सर्वांनी यातून बोध घ्यावा, असा गेट-टुगेदर या सुप्रभात ग्रुपने आयोजित केला.

सुप्रभात ग्रुपमधील सदस्य श्री. सुरेश तोरसे, श्री. डॉ.भानुदास शेंडगे, श्री. घाडगे मेजर, श्री. कुमार नाळे सर, श्री. भीमराव शेंडगे, श्री. राजाभाऊ देशमुख सर, श्री. ॲड. आप्पासाहेब वाघमोडे, श्री. सुरेश कोरे, श्री‌ मोहिते भाऊ, श्री. आबा गोरड, श्री. नितीन गायकवाड, श्री. निकम ज्वेलर्स, श्री. डॉ. देविदास गेजगे, श्री‌‌. सुरेश पवार, श्री‌. सोमनाथ वाणी, श्री. तात्या राऊत,श्री. बाबर सर, श्री. साळुंखे मेजर, श्री. सिद मेडिकल, श्री. राठोड साहेब, श्री. गोरड गुरुजी, श्री. पांडुरंग सूर्यवंशी, श्री. पांडुरंग देवकर, श्री. सुनील कांबळे, श्री. संतोष माने, श्री. राकेश शिंदे, श्री. गोविंद (तात्या) गायकवाड, श्री. डॉ. सुरेश कुलकर्णी आणि इतर मित्र मंडळी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button