माळशिरस मध्ये होम वोटिंगचे ९८ टक्के मतदान
माळशिरस (बारामती झटका)
८५ वर्षाच्या पुढील मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना निवडणूक आयोगाने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार २५४ माळशिरस विधानसभा मतदारसंघांमध्ये ८५ वर्ष वयाच्या पुढील ४०२ व ३८ दिव्यांग असे एकूण ४४० मतदारांनी गृह मतदानाचा पर्याय निवडला होता. यापैकी 85 वर्षे वयापुढील ३९० तर ३८ दिव्यांग बांधवांनी मतदानाचा हक्क बजावला. गृह मतदानाची प्रक्रिया दि. १४ नोव्हेंबर २०२४ ते १६ नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडली. यामध्ये ४२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी गृह मतदानाचा पर्याय निवडलेल्या १००% दिव्यांग बांधवांनी मतदान केले.
१०४ वर्ष वयाच्या छाया चव्हाण, सरुबाई नाईक नवरे, हनुमंत जाधव, अब्दुल मुलाणी या ४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुविधा केंद्रामध्ये टपाली मतदान प्रक्रिया सुरळीत चालू आहे. दि. १७ नोव्हेंबर अखेर ८९७ निवडणूक कर्तव्यर्थ कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूक कर्तव्यर्थ कर्मचारी यांचे टपाली मतदान १९ तारखेपर्यंत चालू राहील.
विजया पांगारकर
निवडणूक निर्णय अधिकारी
२५४ माळशिरस (अ.जा.)
विधानसभा मतदारसंघ
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.