ताज्या बातम्यासामाजिक

माळशिरस नगरपंचायत कर निर्धारण अधिकारी विकास पवार अँटी करप्शनच्या जाळ्यात…

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस नगर पंचायतीचे कर निर्धारण अधिकारी श्री. विकास गोरख पवार (वय ३८), दीड हजार रुपये लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले.

हकीगत अशी की, बिनशेती जागेची नोंद घेऊन त्यांना मालमत्ता उतारा देण्यासाठी श्री. विकास गोरख पवार कर निर्धारण अधिकारी, माळशिरस नगरपंचायत माळशिरस, यांनी शासकीय फी व घरपट्टी व्यतिरिक्त दीड हजार रुपयांची मागणी करून सदरची रक्कम त्यांच्या कार्यालयात स्वीकारल्या वरून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ प्रमाणे माळशिरस पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग पुणे श्री. शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकाचे प्रमुख लाच लुचपत प्रतिबंधक सोलापूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री. कुंभार, पोलीस अंमलदार, सहाय्यक पोलीस फौजदार कोळी, पोलीस हवालदार सोनवणे, पोलीस हवालदार घुगे, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड यांच्या पथकाने ही कार्यवाही केलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button