ताज्या बातम्या

माळशिरस नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी माजी नगरसेवक संतोष आबा वाघमोडे यांची बिनविरोध निवड..

माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते डॉ. आप्पासाहेब देशमुख गटाला बिनविरोध संतोष आबा वाघमोडे यांना नगरसेवक होण्याचा बहुमान मिळाला…

माळशिरस (बारामती झटका),

माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते विद्यमान नगरसेवक डॉक्टर आप्पासाहेब देशमुख गटाला बिनविरोध स्वीकृत नगरसेवक संतोषआबा वाघमोडे यांना बहुमान मिळालेला आहे.

माळशिरस नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक श्री. धनाजी देवकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासन अधिकारी अकलूज विभागाच्या प्रांत विजया पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड त्यांना नायब तहसीलदार अमोल कदम यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले तर माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉक्टर कल्याण हुलगे यांनी सहकार्य केले.
माळशिरस नगरपंचायत कार्यालयात गुरुवार दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये डॉ. आप्पासाहेब देशमुख गटाकडून माजी नगरसेवक संतोषआबा वाघमोडे यांचा एकमेव अर्ज असल्याने पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी बिनविरोध स्वीकृत नगरसेवक संतोष आबा वाघमोडे यांच्या नावाची घोषणा केली.

यावेळी माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते डॉ. आप्पासाहेब देशमुख, विद्यमान नगराध्यक्ष श्री. सचिन वावरे, माजी नगराध्यक्ष श्री. शिवाजीराव देशमुख, उपनगराध्यक्ष श्री. अजिनाथ वकुंळदे, उपनगराध्यक्ष श्री. वैभव जानकर, नगरसेवक श्री. विजयराव देशमुख, नगरसेवक श्री. महादेव कोळेकर, नगरसेवक श्री. सुरेशराव टेळे, नगरसेवक श्री. दादासाहेब शिंदे, नगरसेवक श्री. कैलास वामन, नगरसेवक श्री. रणजीत ओवाळ, नगरसेवक श्री. दादासाहेब गेजगे, नगरसेवक श्री. रघुनाथ चव्हाण, माजी नगरसेवक श्री. सुरेशआबा वाघमोडे, माजी नगरसेवक श्री. रणजीतमालक मोटे, ज्येष्ठ नेते माजी पोलीस पाटील मारुतराव तेलंगे पाटील, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तानाजीराव शिंदे, ज्येष्ठ नेते सुरेशराव लवटे, उद्योजक अमोलशेठ यादव, श्री. महादेव गोरे, श्री. मामाजी वाघमोडे, श्री. बाळासो वाघमोडे, श्री. विष्णुपंत वाघमोडे, श्री. दिलीप आप्पा मंजुळे, श्री. अभिजीत पिसे, श्री. उत्तम शेगर, श्री. योगेश पुराणिक, बापू क्षीरसागर, श्री. तानाजी सरगर, श्री. गब्बर पठाण, श्री. कालिदास मिसाळ, श्री. साहेबराव टेळे, नूतन स्वीकृत नगरसेवक यांचे बंधू मार्गदर्शक तात्यासाहेब वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी नगरसेवक संतोषआबा वाघमोडे यांची बिनविरोध स्वीकृत नगरसेवक पदी निवडीची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतीषबाजी व गुलालाची उधळण केली. ग्रामदैवत व महापुरुषांना अभिवादन करण्याकरता उपस्थित सर्व वाद्याच्या गजरामध्ये रवाना झाली होती.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

5 Comments

Leave a Reply

Back to top button