माळशिरस नगरपंचायतीचे नववे बिनविरोध नगराध्यक्ष वस्ताद विजयराव देशमुख यांना बहुमान मिळाला…..
मातोश्री द्रोपदी देशमुख यांच्या नगराध्यक्ष खुर्चीवर बंधू माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या सहकार्याने मुलगा वस्ताद विजयराव देशमुख नगराध्यक्ष पदावर बसण्याचे एकमेव ठरले….
माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी वस्ताद विजयराव बाजीराव देशमुख यांनी मंगळवार दि. ३१/१२/२०२४ रोजी माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉक्टर कल्याण हुलगे यांच्याकडे नामनिर्देशन पत्र मान्यवरांच्या उपस्थितीत सादर करण्यात केले आहे. उमेदवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख व वेळ संपल्यानंतर एकमेव अर्ज आलेला आहे. मुख्याधिकारी नगरपरिषद पंढरपूर तथा पिठासन अधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव दि. ०८/०१/२०२५ रोजी निवडणूक विशेष सभेमध्ये बिनविरोध नगराध्यक्ष वस्ताद विजयराव देशमुख यांच्या नावाची अधिकृत घोषणा करतील.
माळशिरस नगरपंचायतीच्या राजकीय इतिहासात प्रथमच मातोश्री द्रोपदी देशमुख यांच्या नगराध्यक्ष खुर्चीवर बंधू माजी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांच्या सहकार्याने मुलगा वस्ताद विजयराव देशमुख नगराध्यक्ष पदावर बसण्याचे एकमेव मानकरी ठरलेले आहेत. दोन टर्म झाले तरी अजून नगरसेवक पदाचे स्वप्न अपुरे राहिलेले अनेकजण आहेत मात्र, आई, बंधू व स्वतः नगराध्यक्ष होण्याचा बहुमान वस्ताद विजयराव देशमुख यांना मिळालेला आहे.
माळशिरस नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर लक्ष्मी भीमराव सावंत, मधुमती हनुमंत सोनवणे, मनीषा सुनील इंगळे, लतादेवी धुळदेव सिद, द्रौपदी बाजीराव देशमुख असे पाच नगराध्यक्षा यांचा पदाचा कार्यकाल झालेला आहे. दुसऱ्या टर्ममध्ये श्री. आप्पासाहेब एकनाथ देशमुख, श्री. शिवाजीराव ज्ञानदेव देशमुख, सौ. ताई सचिन वावरे यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यकाल पूर्ण केलेला आहे. सौ. ताई सचिन वावरे यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दि. १७/१२/०२०२४ रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सुपूर्त केलेला होता. नगराध्यक्ष पदाच्या रिक्त जागेच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झालेले असून नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे. ८ जानेवारी २०२५ रोजी मुख्याधिकारी नगरपरिषद पंढरपूर तथापिठासन अधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव नववे नगराध्यक्ष वस्ताद विजयराव बाजीराव देशमुख यांच्या नावाची घोषणा करतील, फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Love this post! Your insights are always so valuable and well-written. Keep up the amazing work!
Very energetiic post,I njoyed that bit. Will tuere bee a
part 2?