माळशिरस नगरपंचायतीच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ. ताई सचिन वावरे यांच्या शुभहस्ते पुलाचे उद्घाटन संपन्न झाले….

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून कॅनलवरील प्रलंबित पुलाचा प्रश्न मार्गी लागला…
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून अनेक दिवस प्रलंबित असलेल्या कॅनलवरच्या पुलाच्या प्रश्न मार्गी लागलेला आहे.
माळशिरस नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्र. २ मधील ६१ फाटा, वगरे वस्ती येथील कॅनलवरील पुलाचे उद्घाटन माळशिरस नगरपंचायतीच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ. ताई सचिन वावरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी युवा उद्योजक सचिनआप्पा वावरे, सर्जेराव वगरे, विष्णुपंत वगरे, धनाजी वगरे, संतोष वगरे, छाया वगरे, मयुरी वगरे, पल्लवी वगरे, धुळदेव देशमुख, अमोल चौरे, विकास साळुंखे, तुकाराम सुळ, पप्पू वगरे, पंकज वगरे, अंबू वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
माळशिरस नगरपंचायत वार्ड क्र. २ मध्ये बिनविरोध नगरसेविका होण्याचा बहुमान मतदारांनी सौ. ताई सचिन वावरे यांना दिलेला होता. वार्डामधील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावलेले आहेत. कॅनलवरील पुलाचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित होता. युवा नेते सचिन आप्पा वावरे यांनी माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून कॅनलवर पुलासाठी निधी मंजूर केलेला आहे.

सदरच्या पुलाचा माळशिरस नगरपंचायतीच्या बिनविरोध नगराध्यक्ष पदावर बहुमान मिळाल्यानंतर उद्घाटन समारंभ संपन्न झालेला आहे. कॅनलच्या पुलावरून अनेक लोकांना दोन्हीकडील बाजूच्या स्थानिक नागरिक व आजूबाजूच्या लोकांना फायदा होणार असल्याने वार्ड क्र. २ मधील नागरिकांसह माळशिरस शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.